
Inspirational Army Journey
ESAKAL
Defence Exam Motivation : जांभळेवाडी (ता. शिराळा) येथील स्वरुपा महादेव हवालदार हिने कोणतीही शिकवणी न लावता ऑनलाइन मार्गदर्शनावर जिद्द, चिकाटीच्या जोरावर सैन्यात लेफ्टनंटपद मिळवले. लहानपणी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवले. तिने तीन वर्षे अथक प्रयत्न केले. आठ वेळा अपयश पचवून नवव्या वेळी यश मिळवले.