दुष्काळात सोशल मिडीयाच्या आवाहानंतर शाळेचा पाणी प्रश्न सुटला..

solapur
solapur

उपळाई बुद्रूक(सोलापूर) - यंदाच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे माढा तालुक्यातील बहुतांश गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. वडाचीवाडी (उ.बु) येथील जिल्हा परिषद शाळेत सव्वाशेच्या आसपास पटसंख्या असुन, शाळा आयएसओ करण्यात आली आहे. शाळेची गुणवत्ताही चांगली, परंतु शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची कायमस्वरूपी उणीव भासत होती. त्यामुळे येथील शिक्षकांनाही प्रश्न सतत भेडसावत असे. दुष्काळामुळे शेतकरी आधीच हैराण, त्यात पाणी कोणाकडे मागणार? कोणाला  मागणार ? विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार्यां शिक्षकांपुढे असा पाण्याचा प्रश्न उभा होता.

मग काय 'संकटात हार मानतील ते शिक्षक कसले' शाळेतील शिक्षकांनी गावातील प्रमुख नागरिकांच्या पुढे ही समस्या मांडली. व सोशल मिडीयाच्या माध्यामातुन मदतीचे आव्हान केले. त्याच्या या आव्हानाला प्रतिसाद मिळत एक बोअर घेण्याइतके पैसे जमा झाले. त्यातुन एक बोअर घेण्यात आला. अन् शाळेतील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटला. यासाठी धनंजय  नागटिळक यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी मुख्याध्यापक योगेश भांगे, सचिन पवार, रंजना दहिटणकर, ज्योती घाटुळे या सहकाऱ्यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांची पाणी दैना घरोघरी मांडली. त्यामुळे गावातील सगळ्यांनी सहकार्य करण्याचे ठरवले पालक व ग्रामस्थांनी मदत केली. यासाठी सरपंच शंकर डोंगरे, सहायक कामगार आयुक्त नितीन कवले, माजी शिक्षक सुभाष सातपुते, दत्तात्रय काळे, शिवाजी काळे, जयराम काळे, श्रीराम काळे, कालिदास हुंबे, दिनानाथ काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

झाडे जगवण्यासाठी व विद्यार्थ्यांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी शाळेला स्वतंत्र बोअरवेल असणे हि गरज ओळखुन सोशल मिडीयाच्या माध्यामातुन व दानशूर व्यक्तींना भेटून हि समस्या सांगितली .झाडे जगली तर शाळेचे सौंदर्य टिकेल. हे गावकऱ्यांनाही मनोमन पटले. त्यामुळे हे शक्य झाले.
- धनंजय नागटिळक, शिक्षक - जिल्हा परिषद शाळा, वडाचीवाडी (उ.बु)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com