

कोल्हापूरनंतर आता 'या' जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी लढणार एकत्र, भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार?
esakal
Sangli Both NCP Allience : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख मंडळी, कार्यकर्त्यांनी एकसंध व जिद्दीने काम करून विरोधकांना शिराळा नगरपंचायतीमधील एकही जागा जिंकता येणार नाही, असा बंदोबस्त करावा,’’ असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिराळा नगरपंचायतीसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवतील, हे स्पष्ट करत उलट-सुलट चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.