धोम, पतंगराव गेले...सागरेश्‍वर पोरके झाले; विकासकामे रेंगाळली

After Mohite & Patangrao. Sagareshwar Sanctuary became an orphan; Development work lingered
After Mohite & Patangrao. Sagareshwar Sanctuary became an orphan; Development work lingered

देवराष्ट्रे ः देशातील पहिले मानवनिर्मित असं सागरेश्‍वर अभयारण्य आहे. ते आपल्या सांगलीत आहे...ते देशात एक नंबर पाहिजे असं ज्येष्ठ नेते पतंगराव कदम म्हणायचे. वृक्षमित्र धो. म. मोहिते यांच्यानंतर त्यांनी या अभयारण्याचे खऱ्या अर्थाने पालकत्व घेतले. इथल्या अनेक विकास कामांना त्यांनी गती दिली. मात्र त्यांच्या पश्‍चात हे अभयारण्य आता पोरके झाले आहे. 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे आजोळ देवराष्ट्रे गाव. इथल्या मातीतच यशवंतरावांचा पिंड पोसला. इथल्या सागरेश्‍वरावर त्यांची श्रद्धा. हा सुंदर परिसरात वन्यप्राण्यांसाठी मुक्त आश्रयस्थान असावं...असं यशवंतराव चव्हाण यांची मनीषा होती. मात्र त्यांचे हे स्वप्न धो. म. मोहिते यांनी तडीस नेलं. धो. मं नी अखेरपर्यंत या अभयारण्यासाठी ध्यास घेऊन काम केले. पुढे या अभयारण्याला यशवंतरावांचं नाव देण्यात आलं. या दोघांचाही असलेले निस्सीम जिव्हाळा पाहता "धोमं'चे सारे परिश्रम सार्थकी लागले. 

पतंगरावांनी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात कुंडलला राष्ट्रीय वनअकादमी आणली. संपूर्ण अभयारण्याच्या कुंपणाच्या कामाला गती दिली. हे सांगलीचं पर्यटनस्थळं झालं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. 1983 मध्ये या अभयारण्यात हरणांच्या दोन जोड्या सोडण्यात आल्या. आज हे अभयारण्य सर्वाधिक हरणांचे आश्रयस्थान आहे. अलीकडे तर आजूबाजूचे शिवारही हरणांनी व्यापले आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे.

2013 मध्ये पतंगराव यांनी वनमंत्री म्हणून धुरा स्वीकारली. त्यांनी पहिली भेट सागरेश्‍वरला दिली. इथल्या पर्यटन वाढीसाठी व सोयीसुविधासाठी त्यांनी गती दिली. त्यानंतर इथे माहिती केंद्र, प्रशिक्षण केंद्र, पर्यटकांसाठी माहितीपट दाखवण्याची सुविधा, बहुउद्देशीय सभागृह, अभ्यागत कक्ष, लहान मुलांसाठी बालोद्यान, छत्री बंगला, अभयारण्यातील राहिलेल्या भागास कुंपण, प्राण्यांसाठी पाणवठे, बंधारे, व हरणाच्या चाऱ्यासाठी गवताचा प्लॉट, विश्रामगृह दुरुस्ती, स्वागत कमान, रातवा कुटी, बांबुकुटी हाऊस अशा पर्यटकांसाठी सुविधा निर्माण झाल्या. मात्र आघाडी सरकार गेल्यानंतर पाच वर्षे या अभयण्यासाठी निधीचा दुष्काळ सुरू झाला आणि आजही तो कायम आहे. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com