महापौरांच्या आदेशानंतर अतिक्रमण निर्मूलनची नौटंकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सांगली - नावालाच शंभर फुटी रुंदी असलेल्या बहुचर्चित
रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची "नौटंकी' आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली. महापौर संगीता खोत आज सकाळी या रस्त्यावर स्वच्छता मोहीमेसाठी आल्या असताना त्यांनी वाहनांचे अतिक्रमण पाहून तातडीने
अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.

सांगली - नावालाच शंभर फुटी रुंदी असलेल्या बहुचर्चित
रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची "नौटंकी' आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली. महापौर संगीता खोत आज सकाळी या रस्त्यावर स्वच्छता मोहीमेसाठी आल्या असताना त्यांनी वाहनांचे अतिक्रमण पाहून तातडीने
अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर अतिक्रमण विभागाने मोठ्या फौजफाट्यासह मोहीम राबवून रस्ता गिळंकृत केलेल्या वाहनांमधून अगदी शोधून दोन-तीन वाहने उचलून मोहीम पुर्ण केली.

सिव्हील हॉस्पिटल रोडवर कालच (सोमवारी) एका महिलेचा अपघातात बळी गेला. त्यानंतर नागरिकांमधून रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणाबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सिव्हील हॉस्पिटलच्या चौकापासून गारपीर चौकापर्यंतचा रस्ता खोकी, हातगाडे आणि सर्वात महत्वाचे ऍम्ब्युलन्सच्या अतिक्रमणाने गिळंकृत केला आहे. या अतिक्रमणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष
केलेल्या महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळेच महिलेला जीव गमवावा लागला.

आजही हा रस्ता अतिक्रमणात गुदमरला आहे. तीच अवस्था शंभर फुटी रोडची आहे. त्या रस्त्यावरही वाहनांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. आता याच रस्त्यावर पोलिस मदत केंद्रही उभे केले आहे. तेही अतिक्रमणच ठरावे अशा
पध्दतीने उभे केले आहे. मात्र त्याची कुणालाच तमा नाही. नावालाच शंभर फुटी असलेला हा रोड प्रत्यक्षात 50 फुटीही राहिलेला नाही. त्या रस्त्यावर असलेल्या अनेक दुकानदारांची वाहनेच रस्ता अडवून उभी केलेली आहेत.

महापौर संगीता खोत आज सकाळी शंभर फुटी रस्त्यावर स्वच्छता अभियानासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी या रस्त्याची दुर्दशा पाहिली. वाहनांनीच निम्मा रस्ता अतिक्रमित केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रस्त्यावरच उभ्या केलेल्या वाहनांमधून स्वच्छता मोहीम राबवण्याची वेळ आली. त्यामुळे
त्यांनी रस्त्यावरील बेवारस वाहने हटवण्याचे आदेश दिले. त्यानंतर अतिक्रमण विभागाचे प्रमुख सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी शंभर फुटी रोडवरुन काही बेवारस गाड्या उचलून नेल्या. तेवढ्यावरच कारवाई थांबली. आता या इशाऱ्यानंतर तरी हा रस्ता मोकळा होणार का? असा प्रश्‍न आहे.

गेली अनेक वर्ष शंभर फुटी रोडवर अतिक्रमण होत आहे. वाहने रस्त्यावरच उभी केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. आजच्या कारवाईनंतर
ते स्वत: अतिक्रमण काढून घेतील अशी अपेक्षा आहे. हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी यापुढे सतत पाठपुरावा करणार आहे.
- महापौर संगीता खोत

Web Title: After the order of the mayor, the encroachment was abolished