
निपाणी : कोरोना काळानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच गरजू वस्तूंच्या भावात छुप्या पद्धतीने दरवाढ होत असल्याने बजेट कोलमडत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसनंतर खाद्यतेलाची किंमत वाढू लागल्यामुळे गृहिणींच्या बजेटवरही परिणाम होत आहे.
सोयाबीनचे भाव स्थिर असले तरी त्याच सोयाबीनच्या तेलाचे दर प्रचंड भाव खात आहेत. दोन ते तीन वर्षांपासून सोयाबीन पीक समाधानकारक आहे. ऐन हंगामात पिकाचे भाव पडलेले असतात. सध्या सोयाबीन तेलाच्या 1 किलोसाठी 135 ते 140 रुपये मोजावे लागतात. ज्या सोयाबीनपासून हेच तेल बनते ते सोयाबीन केवळ 32 ते 40 रुपये किलो आहे. अनेक वर्षांपासून सोयाबीन पिकांचा भाव उत्पन्न खर्चापेक्षा ही कमीच आहे.
सोयाबीनपासून बनविल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यालाच तेल विकत घेणे परवडणारे नसल्याचे चित्र आहे. शासनाने जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करुन दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
सोशल मीडियावरही खिल्ली
रोजच्या जीवनात आवश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस छुप्या पद्धतीने वाढत आहेत. याचा संताप सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. प्रामुख्याने "वा रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल' आयशाची पोस्ट व्हायरल होत आहे.
खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडत आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट ओढवले असताना जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे.
- सविता जाधव, गृहिणी, निपाणी
खाद्यतेलाचे प्रतिकिलोचे दर
शेंगतेल*170
सोयाबीन*140
सरकी*145
सूर्यफूल*160
पामतेल*130
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.