लेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित
कुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले चक्री उपोषण 16 जानेवारी बुधवारी रात्री उशिरा उजनी धरण पाणी व्यवस्थापन, भिमानगरचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

11 डिसेंबर 2018 पासुन सुरू असलेल्या या चक्री उपोषणाला अनेक नेत्यांनी भेट देऊन पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनला न जुमानता समितीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी उजनी धरणाच्या जलाशयात जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. यांची दखल घेऊन आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबरोबर केलेल्या चर्चेनंतर शिवतारे यांनी सीना माढा योजनेचे पाणी कुर्डु, अंबड, पिंपळखुटे, शिराळ या गावांना मिळण्याबाबत जिल्हा प्राधिकरण अधीक्षक अभियंता यांना बंद पाईपलाईनचा प्रस्ताव एक महिन्यात सादर करावा असे निर्देश दिले होते.
या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता साळे यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन या प्रश्नावर लवकरात लवकर सर्वेक्षण करून प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात येईल असे आश्वासन देताना उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करावे अशी विनंती केली होती या विनंतीवरून हक्काचे पाणी संघर्ष समिती सदस्य व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एक महिन्यासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले.