शेतकरी, कष्टकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी 3 डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन 

नागेश गायकवाड
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आटपाडी - शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या विविध प्रश्नासाठी येथे बैठकीत बेमुदत धरणे आंदोलन लढ्याचे रणशिंग फुंकले. मुंबईत आझाद मैदानावर 3 डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे.          

आटपाडी - शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या विविध प्रश्नासाठी येथे बैठकीत बेमुदत धरणे आंदोलन लढ्याचे रणशिंग फुंकले. मुंबईत आझाद मैदानावर 3 डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे.          

आटपाडी तालुक्याच्या सुकन्या आणि समाजसेविका श्रीमती कल्पना इनामदार यांनी आटपाडी, जत आणी खानापूर भागातील सामाजिक कार्यकर्त्यांची भिवघाट येथे भीमाशंकर मंदिरात बैठक घेतली. बैठकीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. तसेच वाढत चाललेली बेरोजगारी, भ्रष्टाचार,शासनाची खोटी आश्वासने, शेतमालाचे ढासळलेले बाजार भाव, जाती- जाती आणि धर्मात वाढत चाललेले तेड, आरक्षणाचा प्रश्न आदी वर चर्चा झाली. हे सारे प्रश्न घेऊन मुंबईत सोमवार 3 डिसेंबर पासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन लढण्याचे रणशिंग फुंकले. त्याची बैठकीत प्राथमिक चर्चा आणि नियोजन केले.या बैठकीला जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होती.

Web Title: agitataion on aazad maidan for farmers