45 गावे कोरडवाहू निश्चित करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची धार तीव्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - यंदाच्या लोकसभा निवडणूकीपुर्वी 45 गावे कोरडवाहू म्हणून निश्चित करा. या मागणीसाठी तालुक्याच्या दक्षिण भागात आंदोलनाची धार तीव्र होऊ लागली आहे. पण ही धार 2019 मध्ये कोणाला त्रासदायक होणार आणी याचा फटका कुणाला बसणार याविषयी मात्र दबक्या आवाजात चर्चा होऊ लागल्या. 35 गावाच्या आंदोलनाप्रमाणे 45 गावातून विधानसभेचे नेतृत्व तयार होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

मंगळवेढा - यंदाच्या लोकसभा निवडणूकीपुर्वी 45 गावे कोरडवाहू म्हणून निश्चित करा. या मागणीसाठी तालुक्याच्या दक्षिण भागात आंदोलनाची धार तीव्र होऊ लागली आहे. पण ही धार 2019 मध्ये कोणाला त्रासदायक होणार आणी याचा फटका कुणाला बसणार याविषयी मात्र दबक्या आवाजात चर्चा होऊ लागल्या. 35 गावाच्या आंदोलनाप्रमाणे 45 गावातून विधानसभेचे नेतृत्व तयार होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 35 गावाच्या पाण्यावरून मोठे राजकीय वादळ उठले. यात नेत्याना गावबंदी केली. सुरुवातीला हे आंदोलन राजकीय नाही अशी सूर व्यक्त केला गेला. त्यामुळे या आंदोलनाला पस्तिस गावातील जनतेने मोठा प्रतिसाद दिल्यामुळे 10 गावात लोकसभा निवडणुकीला बहिष्कार आणि बारा गावातील मतदान झाले आणि या नंतर बरेच दिवस वेगळ्या मार्गाने पाण्यासाठी आंदोलन झाले. त्यावेळी पाणी देणार नसाल तर ही गावे कर्नाटकला जोडावीत अशी मागणी केली. आताही तीच मागणी आहे. 

या आंदोलनाच्या माध्यमातून भारत भालके यांचा विधानसभेचा मार्ग सुकर झाला. या भागाला पाणी देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असल्याची शक्यता वर्तवली गेल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भालके यांनी त्यांनी मदत केलेल्या आंदोलकांना दामाजी कारखाना पंचायत समिती पंचायत समितीवर संधी दिली त्यामुळे या आंदोलकांनी पाण्याच्या मुद्द्याला बगल दिली. 2009 नंतर एकही आंदोलन झाले नाही. या भागाच्या पाण्याचे नेतृत्व आमदार भारत भालके यांनी स्वतः केले त्यासाठी त्यांनी याचिकाही दाखल केली. याचिकाकर्ते जरी कार्यकर्ते असले तरी त्यामागे आर्थिक रसद मात्र भालकेची होती. निवडणुकीला वर्षाचा अवधी असताना आता 45 गावांना कोरडवाहू गावाचा दर्जा द्यावा यासाठी आंदोलन सुरू झाले यातील काही आंदोलन हे जुनेच आहेत.परंतु यापूर्वीचा 2009 चा अनुभव जनतेला चांगलाच आहे.या कोरडवाहू गावात सर्वात जास्त मतदार हे धनगर समाज असल्यामुळे या समाजाची यात आग्रही भूमिका आहे.यासाठी मोठा लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत. त्यात महिन्यात धनगर आरक्षणावरून गोपीचंद पडळकर यांनी हुन्नुर येथे घेतलेल्या सभेत समाजाची उपस्थिती विचार करणारी होती. यामध्ये पडळकर यांनी तालुक्यामध्ये धनगर समाज सर्वाधिक असताना निर्णायक भुमिका घेत असल तर आमदार का होऊ शकत नाही अशी खंत व्यक्त समाजातील  तरूणांना  प्रोत्साहित केले.त्यामुळे कोरडवाहू चे आंदोलन कुणाला भविष्यात तापदायक ठरते याची चर्चा मात्र तालुक्यातील होत असली तरी सध्या कोरडवाहूचा हिच आग्रही मागणी आहे.

Web Title: agitation for 45 villages in mangalwedha