कोल्हापूरः महावितरणवर आज सर्वपक्षीय मोर्चा 

कोल्हापूरः महावितरणवर आज सर्वपक्षीय मोर्चा 

कोल्हापर - कृषी वीज बिलातल्या सवलतीची अमलबजावणी करावी, वीज कनेक्‍शन तत्काळ मिळावीत, वाढीव वीज बिले कमी करा. यंत्रमागधारकांना वीजदरात सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी आज (ता. 1) दसरा चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय धडक मोर्चा काढला जाणार आहे.

प्रा. एन. डी.पाटील, माजी खासदार राजू शेट्टी व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. दुपारी 12 ला दसरा चौक येथून हा मोर्चा निघणार असून सर्व पक्षीय कार्यकर्ते यात सहभाग घेणार आहेत. 

महावितरणकडून राज्य शासनाची फसवणूक होत आहे. चुकीच्या पध्दतीने वीज दर आकारून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे. याविरूध्द सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा निर्णय सर्व पक्षीय नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

प्रमुख मागण्या : 

  • पोकळ थकबाकी अद्यापही मंजूर नाही 
  • लुघदाब कृषी वीजपंपधारकांची बिले कमी करावीत 
  • 42 लाख कृषीपंपधारकांची वीजबिले तपासून त्यावर कृषी संजीवनी योजना जाहीर करा 
  • कृषी संजीवनीची बिले दुरूस्त करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com