सांगली : कॉलेज कार्नर येथे 'भारतीय विद्यार्थी' चे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

बारावी उत्तीर्ण अनेक विद्यार्थ्यांना बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी साठी प्रवेश नाकारले जात आहेत. संबंधित महाविद्यालयातून प्रवेश संपल्याचे सांगण्यात येते.

सांगली : सांगली परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. साठी प्रवेश मिळाला नाही. महाविद्यालय प्रशासनांनी वाढीव जागांना मंजुरी घ्यावी यासाठी भारतीय विद्यार्थी संसदतर्फे आज कॉलेज कॉर्नर येथे आंदोलन झाले. 

बारावी उत्तीर्ण अनेक विद्यार्थ्यांना बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी साठी प्रवेश नाकारले जात आहेत. संबंधित महाविद्यालयातून प्रवेश संपल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सांगली परिसरातील अनेक विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहण्याचा धोका आहे. महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाकडे वाढीव जागाचे प्रस्ताव देऊन तात्काळ मंजुरी मिळवावी, विद्यार्थी हितासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून प्रवेश क्षमता वाढवावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. प्रातिनिधीक स्वरूपात केडब्ल्यूसीच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. 

जिल्हाध्यक्ष सचिन सवाखंडे, राहुल चव्हाण, शशिकांत कांबळे, श्रीधर चिकुर्डेकर, पियुष भाटे, अनिल मोहिते, अमित भोसले, सागर कांबळे आदी उपस्थित होते. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Agitation of Bhartiya Vidyarthi at college corner sangli