जागेची भरपाई पाचपट मिळावी, नाहीतर आत्मदहन

हुकूम मुलाणी
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : विद्युत वाहीनीच्या कामामुळे बाधीत जागेचे व पिकांचे नुकसान व पिकांच्या उत्पन्नापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागल्याने भारतीय विद्युत कायद्याप्रमाणे पाचपट भरपाई या मागणीसाठी सोमवारी (ता.27) उपविभागीय कार्यालयासमोर सामुदायीक आत्मदहन करण्याचा इशारा किसान बचाव संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. संतोष पवार यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापारेषण, भैरवनाथ शुगर, फेबटेक शुगर सर्वांनी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्क्स ऑफ लायसेन्स रुल्स 2012 कलम 3 मधील तरतुदीनुसार सर्व शेतकऱ्यांची टॉवर उभारण्या अगोदर संमती घेतली नाही. सदर तार वाहिनी लोकोपयोगी जरी असली तरी खासगी कंपनीच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे भरपाई मिळालीच पाहिजे. 

उपविभागीय कार्यालयाकडे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची प्रत्यक्ष जागेवर परिस्थिती न पाहता कागदोपत्रीच निर्णय देण्याचा घात घातला जात आहे. हा निर्णयही दिला जात नाही या प्रश्‍नी जिल्हाधिकार्‍यांनी वेळेत लक्ष देऊन पंचनामा व प्रत्यक्ष पाहणी करुन आम्हाला न्याय द्यावा व टॉवर खालील, पिकाखालील जागेचा, तारवाहनी खालील घर, गोठा, विहीर, शेततलाव, झाड, तदंभूत घटकांचा प्रत्यक्ष पंचनामा करून बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळावा. या मागणीसाठी सामुदायीक आत्मदहनाचा इशारा निवेदनात दिला.

बऱ्याच शेतकर्‍यांच्या उभ्या पट्टीतूनच विद्युत वाहिनी गेल्याने शेतीचे मार्केट डाऊन झाले आहे. अधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे संतप्त शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्याने महापारेषणच्या अधिकाऱ्याला जखमी व्हावे लागले. दरम्यान या प्रश्‍नी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी महापारेषणचे अधिकारी, फॅबटेक, भैरवनाथ कारखान्याचे अधिकारीसह शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे

.माझ्या दिड एकर शेतात तीन टॉवर उभा केले. एन.टी.पी.सीच्या लाईनखालून लवंगी कारखान्याने तारा ओढल्याने सदरच्या जमीन पडीक असून विकता येत नाही आणि पिकवताही येत नाही. दिलेली भरपाई देखील तोकडी आहे. मागणी करुनही लक्ष दिले जात नाही 
-पांडुरंग चव्हाण, शेतकरी सलगर बु. 
 
Web Title: agitation for land remuneration