मंगळवेढ्यात तहसील कार्यालयासमोर उपोषण

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

2018 च्या खरीप पिक विम्यातून 4012 तुर उत्पादक शेतकऱ्यांला बाजरी व सुर्यफूलाचे विमा देवून तुरीची भरपाई देताना चुकीचे निकष लावून वगळले.त्यांना तात्काळ भरपाई द्यावी.रब्बी दुष्काळ निधीत तालुक्याचा समावेश करण्यात यावा.  दामाजी कारखान्यांनी 74 रूचे थकित ऊस बिल तात्काळ मिळावे.

मंगळवेढा : श्री संत दामाजी व फॅबटेक साखर कारखान्याकडील थकित ऊस बिल व खरीप व रब्बी चा पिक विम्यासह इतर प्रश्नाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.

यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की 2018 च्या खरीप पिक विम्यातून 4012 तुर उत्पादक शेतकऱ्यांला बाजरी व सुर्यफूलाचे विमा देवून तुरीची भरपाई देताना चुकीचे निकष लावून वगळले.त्यांना तात्काळ भरपाई द्यावी.रब्बी दुष्काळ निधीत तालुक्याचा समावेश करण्यात यावा.  दामाजी कारखान्यांनी 74 रूचे थकित ऊस बिल तात्काळ मिळावे.

फॅबटेक कारखान्याकडील 100 रू थकित ऊस बिल रक्कम तात्काळ मिळावी.उजनीतून जादा झालेल्या पाणी कालव्यातून सोडले त्याची पाणी पट्टी आकारू नये.पाऊसाच्या आशेने कमी पावसावर रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली परंतु पाऊसाअभावी रब्बीची सर्व पिके जळून गेली.रब्बी दुष्काळ निधीतून तालुक्याला वगळून 66 हजार शेतकय्रावर अन्याय केला. तर   पीक विमा भरलेले निम्याहून अधिक शेतकरी वगळले.दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्याची झाली.शिवाय पुराचा फटका बसलेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले, परंतु शेतकर्‍यांच्या पदरात एक रुपयाही नाही.यावेळी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अॅड.राहुल घुले, तालुका अध्यक्ष श्रीमंत केदार, शंकर संगशेट्टी, महादेव येडगे, शिवा स्वामी  अनिल बिराजदार,आबा खांडेकर,श्रीकांत पाटील, राजेंद्र राणे, विजयकुमार पाटील, पांडुरंग बाबर, रोहित भोसले, मोहन बुद्दालकर, राजकुमार भरमगोंडे, दत्तात्रेय मांडवे, संजय आळगे, काशिनाथ संघशेट्टी, संभाजी नरोटे, काशिनाथ बिराजदार, परमेश्वर येणपे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation in Mangalwedha