esakal | मंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांतीचे आंदोलन;  आरक्षणास पाठिंब्याचे घेतले पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation of Maratha Kranti morcha in front of minister's house; Letter of support for reservation

राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या घरासमोर आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मंत्री डॉ. कदम यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा देणारे पत्र घेण्यात आले. 

मंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांतीचे आंदोलन;  आरक्षणास पाठिंब्याचे घेतले पत्र

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यासाठी घटना पीठासमोर भक्कम बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, मराठा समाजाचा ईडब्ल्यूईएस मध्ये समावेश करु नये आदी मागण्यांसाठी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या घरासमोर आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मंत्री डॉ. कदम यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा देणारे पत्र घेण्यात आले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात येत आहे. आज सहकार राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या घराबाहेर क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील व विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले आहे. मात्र त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास अंतरिम स्थगिती देत अंतिम निर्णय घेण्यासाठी हा दावा घटनापीठाकडे वर्ग केला आहे. या निर्णयामुळे यंदाच्या वर्षात शैक्षणिक प्रवेश तसेच शासकीय नोकर भरतीमध्ये मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे. 

राज्य सरकारने मराठा समाजाचा ईडब्ल्यूईएसमध्ये समावेश करु नये, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकर भरती करु नये अशा मागण्या करण्यात आल्या. घटना पीठासमोर राज्याची बाजू भक्कम मांडावी. मराठा समाजास आरक्षण मिळवून द्यावे, यासाठी राज्य व केंद्र सरकारवर लोकप्रतिनिधींनी दबाव टाकावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठींब्याची पत्रे देण्याची मागणी क्रांती मोंर्चाच्यावतीने करण्यात आली. यावेळी मंत्री डॉ. कदम यांनी मोर्चाचे समन्वयक देसाई, डॉ. पाटील यांच्याकडे पाठिंब्याच पत्र सोपवले. 

आंदोलनात नितीन चव्हाण, प्रमोद पाटील, राहुल पाटील, भरत पाटील, प्रमोद पाटील, अमोल गोटखिंडे, संभाजी पोळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव