.. तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करणार

.. तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करणार

मंगळवेढा - रत्नागिरी ते नागपूर या महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या संपादीत जमिनीसाठी 2013च्या जमीन अधिग्रहण कायद्याची अमंलबाजणी न करता ठेकेदाराने काम सुरु केले. अदयापही योग्य मोबदला न मिळाल्याच्या कारणावरुन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सांगली ते सोलापूर हा बाधित शेतकर्‍यांचा मोर्चा अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली काढून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी 6 ऑक्टोबर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिगंबर कांबळे यानी दिली.

दोन दिवसात हा जथ्था 53 गावात याबाबत प्रबोधन करणार आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहणची प्रक्रिया शासनाने सुरू केली. त्यांना बाधीत शेतकय्रांना अद्याप कोणताही मोबदला दिला नसून त्याबाबत सविस्तर काहीही सांगण्यात येत नाही राज्य महामार्गासाठी संपादीत केलेल्या जमीनीचा मोबदला दिला नाहीत तोवर रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी जमीन संपादीत केली जात आहे आखील भारतीय किसान सभेने शेतकय्रांच्या जमीनीचे राज्य महामार्गासाठी चे प्रथम जमीन अधिग्रहण करावे त्यानंतर राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी घ्याव्यात या हद्दीत येणारी झाडे विहिरी कूपनलिका पाईपलाईन घरे बांधकामे यांची योग्य मूल्यमापन करून त्याचा मोबदला बाजारभावाच्या पाच पटीने द्यावा जमिनीचा मोबदला देत असताना ज्याची जागेवर घरात वहिवाट आहे त्याचा स्थानिक अधिकार्‍यांच्या मार्फत पंचनामा करून वहिवाट दारांच्या खात्यावर मोबदला जमा करण्यात यावा चुकीचे झालेले सर्वे रद्द करण्यात यावेत जमिनीचा जागेचा दर ठरवत असताना 2017 2018 बाजारभावाच्या पाचपट मिळाला पाहिजे जमीन अधिग्रहण अधिनियम 2013ची अंमलबजावणी होऊन जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेमध्ये संबंधित शेतकर्‍यांना पूर्णपणे विश्वासात घ्यावे जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर कारवाईचे पाठवलेले पत्र पाठीमागे घेऊन कॉम्रेड दिगंबर कांबळे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ रद्द करावेत या मागण्यासाठी हा जथ्या काढून आंदोलन करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com