वंचित'चे 'गाढव'; तर कॉंग्रेसचे 'कुलूप लाव' आंदोलन

solapur
solapur

सोलापूर : महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा घेण्यास चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक गाढवांसह तर कॉंग्रेसचे नगरसेवक ' कुलूप लाव ' आंदोलन करणार आहेत. सभा आज (गुरुवारी) सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. 

 लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली लांबणीवर टाकण्यात आलेल्या अंदाजपत्रकीय सभेची 27 जून ही तारीख निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार पक्षीय स्तरावर आढावा बैठकाही घेण्यात येत आहेत. मात्र या बैठकीला गटबाजीचे गालबोट लागले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांचीच गैरहजेरी मोठ्या प्रमाणात या बैठकीला राहिली आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक दाखविण्यापुरते पक्षनेता सभागृहात तयार होत आहे, प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांचे अंदाजपत्रक डाकबंगल्यात तयार होत असल्याची शक्‍यता भाजपमधीलच काही नगरसेवकांनी व्यक्त केली.

या सर्व पार्श्‍वभूमीवर बजेट मीटिंग पुढे ढकलण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृहनेते संजय कोळी आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी अंदाजपत्रकीय सभा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तसेच अनेक विषयांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अंदाजपत्रकीय सभा बोलावण्यात येईल, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. 

सत्ताधारी पक्षाचा कारभार गाढवाच्या गोंधळासारखा सुरु आहे. त्यामुळे गाढव आंदोलन केले जाणार आहे. 
-आनंद चंदनशिवे नगरसेवक वंचित बहुजन आघाडी

महापालिकेत गेल्या दोन वर्षांत विकासकामांचे महत्वाचे काहीच निर्णय झाले नाहीत. त्यापेक्षा महापालिका बंद केलेली बरी म्हणून सभागृहाला कुलूप लावणार आहे.
- श्रीदेवी फुलारे नगरसेविका, कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com