‘भाजप सरकारचा धिक्कार असो’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

कोल्हापूर - नोटाबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, पैशासाठी रांगेत उभे करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो..अशा घोषणांनी आज दुपारी कोल्हापूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष राजू लाटकर, युवक अध्यक्ष अमोल माने, युवक प्रदेश उपाध्यक्ष आदिल फरास यांच्यासह पन्नासहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करून सरकारने देशाला आर्थिक संकटात टाकले आहे. पैशासाठी रांगेत उभे राहिल्याने अनेकांचा मृत्यू झाला. भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी निदर्शने झाली. ‘अच्छे अच्छे नही रे... बुरे बुरे दिन... आणणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणाही देण्यात आल्या. बंद असलेल्या एटीएमला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.  

कार्याध्यक्ष अनिल कदम, युवराज साळोखे, नागेश फराडे, किशोर माने, सुहास साळोखे, फिरोज सरगुर, प्रमोद पवार, जयदीप सरवदे, सचिन लोहार, दौलत साळोखे, आकाश पाटील, सीताराम बोडेकर, विनोद जाधव, बबलू फाले, रोहित गवंडी, असिफ शेख, समीर पाटील, प्रकाश पाटील, अमोल मधाळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Web Title: agition by ncp youth