फलटण : वाठार निंबाळकर येथे कृषी दिन व वृक्षारोपण संपन्न

संदिप कदम
गुरुवार, 12 जुलै 2018

वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे कृषी कन्या व ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

फलटण शहर (जि. सातारा) -  शेतीबरोबर व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उत्पन्न देणाऱ्याची वृक्षांची लागवड बाधावर तसेच पडक्षेत्रावर करावी यासाठी शासकीय कृषी योजना बोनस असून त्याचा पुरेपुर लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी. डोईफोडे यांनी केले.

वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे कृषी कन्या व ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन व वृक्षारोपणाचा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी मंडल अधिकारी एस. बी. रणसिंग, के. एन. थोरात, अशोक निंबाळकर, सरपंच शारदा भोईटे, उपसरपंच आनंदीबाई तरटे, ग्रामसेवक एम. एन. आढाव, प्राध्यापिका ए. आर. ससाणे, प्राध्यापिक एम. वि. पवार, तरटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित असलेले ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. यासाठी कृषी कन्या सुप्रिया शेंडगे, आरती टिळेकर, प्राजक्ता ढवळे, योगिता पोंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. शिंदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एस. आडत, कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. एस. शिंदे आणि प्रा. आर. व्ही. कर्चे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची प्रास्तवना कृषी कन्या भाग्यश्री सांगळे, सूत्रसंचालन रसिका सोरटे व आभार मेघा चव्हाण हिने केले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Agriculture Day and Plantation at vathar nimbalkar faltan taluka