कृषी विभागाकडून खरीप हंगामाची तयारी

राजकुमार शहा  
गुरुवार, 17 मे 2018

रासायनिक खतांचे मंजुर आवंटन पुढील प्रमाणे
युरीया (5782 मेट्रिक टन )
डिएपी (1188 मेट्रीक टन )
एसएसपी (1751 मेट्रिक टन )
एमओपी (810 मेट्रीक टन )
एनपीके (2834 मेट्रीक टन ) 

मोहोळ : मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागाने येत्या खरीप हंगामाची तयारी केली असुन, शेतकऱ्यांना विविध पिकासाठी 12 हजार 365 मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजुर झाल्याची माहिती कृषी विस्तार अधिकारी योगेश गोटे यांनी दिली.

मोहोळ तालुक्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र 5 हजार 456 हेक्टर आहे सिना नदी आष्टी तलाव व उजनी डाव्या कालव्यामुळे तालुक्यातील मोठे क्षेत्र ओलिता खाली आले आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मोठया प्रमाणात मागणी असते. भिमा लोकनेते व ज कराया या तीन साखर कारखान्यामुळे ऊसाची लागवड मोठया प्रमाणात झाली आहे. तर ऊसाबरोबरच मका भुईमुग कडवळ या पिकाबरोबरच द्राक्ष डाळींब बोर केळी पपई या फळबागांचेही क्षेत्र विस्तारले आहे.

गेल्या रब्बी हंगामातील 2 हजार 572 विविध रासायनिक खताचा साठा शिल्लक आहे. शिल्लक साठा व नवीन मंजुरी यामुळे चालु हंगामात रासायनिक खतांचा तुटवडा भासणार नसल्याचे गोटे यांनी सांगितले.  

रासायनिक खतांचे मंजुर आवंटन पुढील प्रमाणे
युरीया (5782 मेट्रिक टन )
डिएपी (1188 मेट्रीक टन )
एसएसपी (1751 मेट्रिक टन )
एमओपी (810 मेट्रीक टन )
एनपीके (2834 मेट्रीक टन ) 

मागील रब्बी हंगामातील शिल्लक साठा पुढील प्रमाणे 
युरीया  (928 मेट्रिक टन )
डिएपी (591 मेट्रिक टन )
एमओपी (296 मेट्रीक टन )
एसएसपी (428 मेट्रीक टन )
एनपीके (591 मेट्रीक टन )
तालुक्यात एकुण विक्रेते  -150
पॉश मशिनधारक -94 
पॉश मशिनची मागणी -6
शेतकऱ्यांनी ठराविक कंपनीच्याच रासायनिक खतांची मागणी न करता उपलब्ध खतांची खरेदी करावी असे आवाहन गोटे यांनी केली आहे.

Web Title: agriculture department prepare on Kharip season