नगरला शुक्रवारपासून साहित्य मेजवानी 

Ahmadnagar Literature Festival from Friday
Ahmadnagar Literature Festival from Friday

नगर - राज्य सरकारचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे येथे 13 व 14 मार्च रोजी जिल्हा ग्रंथोत्सव होणार आहे. न्यू आर्टस महाविद्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात हा महोत्सव होईल, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. मा. गाडेकर यांनी दिली. 


न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात होणाऱ्या ग्रंथोत्सवाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 13) सकाळी साडेदहा वाजता होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी राहणार असून, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले उपस्थित राहणार आहेत.

 
अहमदनगर जिल्हा वाचनालय ते करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक अशी ग्रंथदिंडी सकाळी 9 वाजता काढण्यात येईल. दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत ग्रंथालय व वाचन संस्कृती विषयावर परिसंवाद, दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली "प्रभावी वाचन माध्यमे' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

नगर प्रेस क्‍लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे संपादक परिसंवादात सहभागी होणार आहेत. 
शनिवारी (ता. 14) सकाळी 10 ते 12 या वेळेत कविसंमेलन होईल. दुपारी 12 ते दीड वाजेपर्यंत "ग्रंथाने मला 
काय दिले?' या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. ग्रंथोत्सवात ग्रंथप्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली राहील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com