अहमदनगरकरांनी धरलाय ठेका... 

sakal festival in ahmednagar
sakal festival in ahmednagar

नगर : सकाळ शॉपिंग महोत्सवात शनिवारी (ता. आठ) स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेल्या "स्वरझंकार' प्रस्तुत "बीट्‌स ऑफ बॉलिवूड' कार्यक्रमात बॉलिवूडमधील "हिट' व अजरामर गाण्यांचा नजराणा सादर झाला. नृत्यांगनांच्या अदाकारीवर रसिक नगरकरांनीही ठेका धरला. मन प्रसन्न करणारे संगीत, सुमधुर आवाजाची गायकी आणि विद्युत रोषणाईने नगरकर अक्षरश: न्हाऊन निघाले. 

मैफलीत भरला रंग 
रसिक श्रोत्यांनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने आणि गाण्यावर धरलेल्या ठेक्‍याने महोत्सवात जल्लोष रंगला. निवेदक रियाज पठाण यांनी या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले. "गणनायका', त्यानंतर सोलह बरस की, रुपेरी वाळूत, बदन पे सितारे, तेरी मिट्टी में मिल जावा, लक्‍ख पडला प्रकाश, अशी एकापेक्षा एक अजरामर गाणी सादर झाली. संदीप चाबुकस्वार, दुर्योधन भारस्कर, प्रिया पवार, रेणुका पवार यांच्या सुरेल आवाजाने मैफलीत रंग भरला. वादक दिलावर शेख, अजय साळवे, संजय आठवले, अजित गुंदेचा, ललित भूमकर, अमन सय्यद यांची त्यांना सुरेख साथ लाभली. 

प्रिया निकम आणि सोनम इनामदार यांनी बहारदार नृत्य सादर केले. रियाज पठाण आणि महेश काळे यांच्या विनोदी शैलीतील उत्कृष्ट निवेदनास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सकाळ शॉपिंग महोत्सव या वर्षी सावेडी भागातील गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकालगतच्या तांबटकर मळा मैदानावर गुरुवारपासून (ता. 6) सुरू आहे. त्याचा रविवारी (ता. नऊ) रात्री दहा वाजता समारोप झाला. 


"गावरान मेवा'ने उडविले हास्याचे फवारे! 
"गावरान मेवा'च्या विनोदवीरांनी सादर केलेली कला रसिकांच्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाची दाद घेऊन गेली. महेश काळे, लहूकुमार चोभे व वैभव कुऱ्हाडे यांनी प्रसंगावधान राखत सादर केलेले विनोद हास्याचे फवारे उडवून गेले. ग्रामीण लेखक किरण बेरड यांच्या लेखणीतून ही "स्क्रिप्ट' साकारली. डॉ. निकिता राजपूत यांच्या प्रबोधनात्मक नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अंजन घातले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com