esakal | LOCKDOWN ः नगरकरांची पहाट उजाडू लागलीय पक्ष्यांच्या किलबिलाटाने... पक्षीनिरीक्षणातील नोंद

बोलून बातमी शोधा

In Ahmednagar, the number of birds has increased

हिवाळ्यात युरोपमधुन भारतात येणार्‍या व उन्हाळ्याच्या सुरूवातीला परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार्‍या येणार्‍या रोझी स्टारलिंग अर्थात पळसमैना या पक्षांनीही भारतात आपला मुक्काम वाढविलेला दिसुन येत आहे. तर मनुष्य वस्तीजवळ सतत निवास करणार्‍या पारवा पक्षांच्या संख्येत घट झालेली दिसुन येते.

LOCKDOWN ः नगरकरांची पहाट उजाडू लागलीय पक्ष्यांच्या किलबिलाटाने... पक्षीनिरीक्षणातील नोंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर - देशव्यापी लाॅकडाऊनला जवळ जवळ २१ दिवस पूर्ण होत आहेत. या कालखंडात वाहने त्यामुळे होणारे प्रदुषण व लोकांची वर्दळ पुर्णपणे थांबली आहे ,अशी घटना यापुर्वी कधीही घडली नसल्याने या घटनेचा पक्षीजीवनावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्रामार्फत एक जिल्हास्तरीय सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये सातत्याने पक्षीनिरीक्षण  करणार्‍या १० तालुक्यांमधील  एकुण १६ पक्षीअभ्यासकांनी आपले मते नोंदवले.

हेही वाचा - रोज दारू-मटण पार्टी, साहेब आवरा..पुणे-मुंबईकरांना

त्यांनी केलेल्या निरीक्षणनोंदींवरून मिळालेले काही सामान्य निष्कर्ष पुढीलप्रमाणे- मानव वसाहतींजवळ राहणार्‍या चिमणी, कावळा, बुलबुल, राखी, वटवट्या, शिंजीर, तांबट, भांगपाडी मैना, साळुंकी, कोकीळ, चिरक या पक्षांची संख्या पुर्वीपेक्षा खुप वाढली आहे. ग्रामीण भागातही चिमण्यांची संख्या पुर्वीपेक्षा वाढली आहे. शहरी भागामध्येही जिथे चिमण्या आजिबात दिसत नव्हत्या, तिथे थोड्याफार प्रमाणात चिमण्या दिसू लागल्या आहेत. गावकावळ्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच जंगली कावळेही दिसू लागले आहेत.

हिवाळ्यात युरोपमधुन भारतात येणार्‍या व उन्हाळ्याच्या सुरूवातीला परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार्‍या येणार्‍या रोझी स्टारलिंग अर्थात पळसमैना या पक्षांनीही भारतात आपला मुक्काम वाढविलेला दिसुन येत आहे. तर मनुष्य वस्तीजवळ सतत निवास करणार्‍या पारवा पक्षांच्या संख्येत घट झालेली दिसुन येते.
पक्षांच्या मनुष्यवस्तींजवळ वाढलेल्या संख्येमुळे पुन्हा एकदा दिवसाची सुरूवात पक्षांच्या किलबिलाटाने होत असल्याचा विलक्षण अनुभव पक्षीमिञांना होत आहे. हळद्या, निळा कस्तुर, कृष्णथिरथीरा,निखार हे निलीमा हे क्वचितच आढळणारे पक्षी आता अंगणात अधुनमधुन सातत्याने हजेरी लावत आहेत.

मोहिमेत हे झाले होते सहभागी
या लाॅकडाऊन पक्षीसर्वेक्षणात जिल्हाभरातुन समुहप्रमुख जयराम सातपुते यांच्यासह प्रा.डाॅ.सुमन पवार, प्रा.डाॅ.अतुल चौरपगार, संदीप राठोड, सचिन चव्हाण, प्रतिम ढगे, डाॅ. नरेंद्र पायघन, मिलींद जामदार, शिवकुमार वाघुंबरे, स्नेहा ढाकणे, सुनिल वाघुंबरे, आशा कसबे, अनमोल होन, शशी त्रिभुवन, राजेंद्र बोकंद, वेदांत देवांग आदी पक्षीअभ्यासक सहभागी झाले होते.