नगर जिल्हा परिषदेत कोणालाच स्पष्ट बहुमत नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, स्थानिक आघाडीही महत्त्वाची ठरणार

नगर: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्व जागांचे निकाल हाती आले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसला 18, भाजपला 14, कॉंग्रेसला 23 व शिवसेनेला 7, तर दहा ठिकाणी अपक्ष विजयी झाले. पारनेर तालुक्‍यात एका जागेवर कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार निवडून आला. दोन ठिकाणी स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले.
एकंदर हाती आलेल्या निकालाचा विचार केला, तर सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हाती जाण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल गुरुवारी (ता. 23) जाहीर झाले. त्यानुसार पाथर्डीत भाजपला तीन, राष्ट्रवादीला एक, शिवसेनेला एक जागा मिळाली. येथे पंचायत समिती ताब्यात ठेवण्यात आमदार मोनिका राजळे यांना यश आले. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीला दोन, भाजपला तीन तर कॉंग्रेसला एक जागा मिळाली. जामखेडला दोनही जागेवर भाजप विजयी झाले. शेवगावमध्ये तीन जागेवर राष्ट्रवादी व एका जागेवर स्थानिक आघाडीचा उमेदवार विजयी झाला. नगर तालुक्‍यात आमदार शिवाजी कर्डींले यांना धक्का देत शिवसेनेने तीन, कॉंग्रेसने दोन व एक जागा राष्ट्रवादीने मिळवली. कोपरगाव तालुक्‍यात राष्ट्रवादीने तीन व कॉंग्रेसने एक जागा मिळवत आमदार स्नेहलता कोल्हे यांना धक्का दिला. श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेसला दोन व स्थानिक आघाडीला दोन जागा मिळाल्या. राहुरीत तीन जागा कॉंग्रेसला तर दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.

कर्जतमध्ये राष्ट्रवादीला दोन, भाजपला दोन तर अकोल्यात दुपारपर्यंत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. नेवाशात माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी राष्ट्रवादी सोडून केलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला सातपैकी पाच जागा मिळाल्या. एक जागा राष्ट्रवादीला तर एक जागा भाजपला मिळाली. पारनेरमध्ये राष्ट्रवादीला एक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एक, शिवसेनेला एक, कॉंग्रेसला एक जागा मिळाली. येथे टाकळी ढोकेश्‍वर गटात फेरमतमोजणी सुरू होती. संगमनेरमध्ये नऊ जागा असून त्यातील चार जागांचे निकाल जाहीर झाले. त्यातील एक ठिकाणी अपक्ष तर आठ ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाली. उर्वरित चार जागांची मतमोजणी उशिरापर्यंत सुरू होती.

या निवडणुकीत आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा परिषदेत एकूण 73 सदस्य आहेत. त्यापैकी 72 ठिकाणी निवडणूक झाली. चांदेकसारे (ता. कोपरगाव) गटाची निवडणूक झाली नाही. लोणी गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनी विखे पाटील या सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या.

जिल्हा परिषद अंतिम संख्याबळ)
एकूण जागा ः 73
निवडणूक झाली ः 72

कॉंग्रेस 23
राष्ट्रवादी कॉंग्रेस 18
भाजप 14
शिवसेना 7
अपक्ष 10

Web Title: ahmednagar zp election result