गर्ल्स हायस्कूलची ऐश्वर्या ठरली देशात अव्वल

संभाजी थोरात
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

कोल्हापूर - भारत सरकारच्या समाजकल्याण खात्यातर्फे लखनौ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस संचालित गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या सुनील सुतार हिने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. मंगळवारी (ता. १८) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत तिचा दिल्ली येथे गौरव होणार आहे. गरीब कुटुंबातून आलेल्या ऐश्वर्याने मिळवलेल्या यशामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर निबंध स्पर्धा घेतली जाते. मानाची असलेल्या या स्पर्धेत देशभरातील शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला होता. 

हिंदीतून झालेल्या या निबंध स्पर्धेत ऐश्वर्या हिने उज्ज्वल यश मिळविले आहे. नुकताच तिला याबाबतचा ई -मेल आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत मंगळवारी (ता. १८) सत्कार होणार आहे. ऐश्वर्याने राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या विषयावर २४ पानी निबंध लिहिला. त्यात तिने बाबासाहेबांचे अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. नववीत शिकणाऱ्या ऐश्वर्याची घरची परिस्थिती बेताची आहे. आई शिवणकाम आणि दोन घरचा स्वयंपाक करते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून दोन मुलींचा सांभाळ केला जात आहे. मुलीने रात्री १२ वाजेपर्यंत जागून निबंध लिहिला. मुलीला मिळालेल्या यशामुळे त्यांना कौतुक वाटत आहे. ऐश्वर्याच्या यशात तिच्या गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे. तिला पुस्तके उपलब्ध करून देण्यापासून स्पर्धेत भाग घेण्यापर्यंत सर्व मदत शाळेने केली आहे. ऐश्‍वर्याच्या यशाबद्दल प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगतफे बक्षीस म्हणून २५ हजार रुपये दिले आहेत. आता शाळाही मदत गोळा करत आहे.

Web Title: Aishwarya was the first country