आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांचा राजीनामा 

आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांचा राजीनामा 

आजरा - आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांच्याकडे दिला आहे. कारखाना चालवण्यासाठी देण्याबाबत उद्या मंगळवार (ता. 16) सुकाणू समिती सदस्य यांची विशेष बैठक बोलवली होती. या बैठकीपुर्वी चराटी यांनी राजीनामा दिल्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली असून कारखान्याच्या पुढील हंगामाबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. 

आजरा कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे यंदा कारखाना चालवण्यासाठी देण्याबाबत संचालक, कामगार यांनी भूमिका घेतली होती. त्याबाबत 6 जूनला विशेष साधारण सभेत ठराव घेण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर कारखाना चालवण्यासाठी देण्याबाबत टेंडर नोटीस प्रसिध्द करण्यात आली.

त्यानुसार सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था, खासगी संस्था, सार्वजनिक नोंदणीकृत संस्था व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती यांच्याकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. पण त्यांची मुदत संपून गेल्याने संचालक मंडळाने निविदा मागविण्याची मुदत वाढवली होती. या पार्श्‍वभूमीवर कारखाना चालविण्यासाठी देण्याकरीता सुकाणू समिती सदस्यांची उद्या मंगळवारी बोलवली होती. आज दुपारी कामगारांनी अध्यक्ष चराटी यांच्या बरोबर कारखाना चालवण्यास देण्याबाबत विचारणा करत शाब्दिक वाद घातला. त्याचबरोबर त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर चराटी यांनी आपल्या पदाचा दिला. 

कारखाना चालविण्यास देण्याबाबत आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली आहे. खासगी संस्था व सहकारी संस्थाशी कारखाना चालविण्यासाठी घेण्याबाबत सातत्याने संपर्क सुरू ठेवला आहे. पण कामगारांनी आज अचानक माझ्याकडे राजीनाम्याची मागणी केली त्याचबरोबर सर्व संचालकांचे राजीनामे मागीतले. त्यामुळे राजीनामा दिला आहे. कारखाना चालवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे कामगार प्रतिनिधींना सांगितले आहे. 
- अशोक चराटी,
अध्यक्ष, आजरा कारखाना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com