अजित पवारांनी मागितली अण्णा हजारे यांची माफी 

Ajit_Pawar
Ajit_Pawar

नगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व राळेगणसिद्धी परिवाराची पत्रकार परिषदेत जाहीर माफी मागितली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याने राळेगणसिद्धी परिवार संतापलेला आहे. त्यामुळेच काल (ता. 31) अण्णांच्या भेटीसाठी पारनेरहून राळेगणसिद्धीकडे निघालेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांना भेटीचा दौरा रद्द करावा लागला होता. 
लोकायुक्त व उपलोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारपासून (ता. 30) उपोषण सुरू केले आहे. 

पारनेरमधील "आधार परिवर्तनाचा' ही संघर्ष यात्रा आटोपून राष्ट्रवादीचे नेते अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीकडे निघाले होते. तथापी, "अण्णा हजारे संघाचे एजंट आहेत', या "राष्ट्रवादी'चे नेते नवाब मलिक यांच्या कथित वक्तव्याने संतापलेल्या ग्रामस्थ महिलांनी या नेत्यांना गावाबाहेरच रोखण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे संघर्ष नको म्हणून नेत्यांनी दौराच रद्द केला. या मुद्यावर भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ""पारनेरमधील सभा संपायला उशिर झाला. त्यानंतर अण्णांच्या भेटीचे नियोजन ठरले. अण्णांशी संपर्कही केला. मात्र, अण्णा झोपले असल्याचे समजल्याने आम्ही दौरा रद्द केला.'' 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्यस्तरीय नेते पारनेरला आले होते. तेथील सभा संपल्यानंतर सर्व नेत्यांनी अण्णांची भेट घेण्याचे ठरविले. मात्र, "राष्ट्रवादी'चे नेते नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वीच, केलेल्या वक्तव्याबद्दल आंदोलनस्थळी त्यांचा निषेध करण्यात आला होता. खास करून महिलांनीच "राष्ट्रवादी'च्या नेत्यांना गावाबाहेर अडवून त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करायचा, असे नियोजन ठरले. 

मलिक यांच्या विधानाशी आपण सहमत आहात का? नसाल तर पक्ष म्हणून तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार? अशी प्रश्‍नावली महिलांनी तयार केली होती. त्यानुसार ग्रामस्थ व महिला पारनेरच्या दिशेने गावाबाहेर येण्यासाठी निघाल्याही होत्या. त्यामुळे या प्रश्‍नांना उत्तरे देताना दमछाक होईल, अशी भीती वाटल्याने "राष्ट्रवादी'च्या नेत्यांनी नियोजित केलेली ही भेटच टाळली. त्यावर आज अजित पवार यांनी स्वत:च पक्षातर्फे भूमिका जाहीर करुन त्यावर पडदा टाकण्यासाठी थेट माफी मागितली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com