कुत्र्या-मांजराच्या उपमांनी राज्याचे प्रश्न सुटणार का?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मलवडी (जि. सातारा) - विरोधकांना कुत्र्या-मांजराच्या उपमा देऊन राज्यातील प्रश्न सुटणार आहेत का? राज्यापुढील प्रश्न सोडविण्यास सरकार अपयशी ठरले असून, हल्लाबोल आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचे नियंत्रण सुटले आहे, अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाजपवर केली.

आज दहिवडी येथे हल्लाबोल आंदोलनादरम्यान आयोजित सभा संपल्यानंतर ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, ‘‘सरकारचे नियंत्रण सुटू लागले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री विरोधकांना विविध जनावरांच्या उपमा देत आहेत; पण यामुळे जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? सामान्य जनता तुमच्या अशा आरोपांना आता भिक घालणार नाही. पराभव समोर दिसू लागल्यामुळे ते हीन पातळीवर उतरून एकप्रकारे आपला पराभव मान्य करत आहेत.’’

Web Title: ajit pawar hallabol movement at Dahiwadi satara news