
Ajit Pawar Ncp : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभ्यासू व राजकीय प्रदीर्घ अनुभव असणारे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आता नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा मिळाला आहे. नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी दिल्याने नाईक समर्थक व कार्यकर्त्यांत नव्याने उत्साह संचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविस्तारासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा पोषक ठरणार आहे. या निवडीने नाईक यांच्या गटात उत्साहासह जबाबदारीही वाढली आहे.