Miraj : जगताप, घोरपडे, नाईकांसह देशमुख अजित पवारांसोबत?: मिरजेतील बैठकीत चर्चा; लवकरच अंतिम निर्णय

Sangli News : प्रवेशासाठी निशिकांत भोसले-पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अजित पवार यांच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील अन्य मान्यवरांना ‘चला, एकसाथ जाऊ’, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
Ajit Pawar meets with political leaders Jagatap, Ghorpade, Naik, and Deshmukh in Miraj to discuss crucial political decisions.
Ajit Pawar meets with political leaders Jagatap, Ghorpade, Naik, and Deshmukh in Miraj to discuss crucial political decisions.Sakal
Updated on

सांगली : भाजपचा राजीनामा दिलेले माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मिरज येथे झालेल्या बैठकीत त्यावर आज खलबते झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com