कन्नड अभिवृद्धी प्राधिकारकडून विद्यार्थ्यांचा सत्कार

राजशेखर चौधरी
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

महाराष्ट्रातील मार्च २०१७ च्या कन्नड माध्यमाच्या शाळांतील दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त एकूण ३५२ विद्यार्थ्यांच्या सन्मान होणार आहे.त्यात प्रथम क्रमांक १२ हजार,द्वितीय क्रमांक ११ हजार, तृतीय क्रमांक १० हजार आणि प्रत्येकी एक शाळेचे बॅग, एक मनगटी घड्याळ, दोन पेनचा संच, दोन शब्दकोष संच, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम रविवार  दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह,गणेश नगर एरंडवणे, पुणे येथे संपन्न होणार आहे.

महाराष्ट्रात कन्नड माध्यमाच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहान दयावे या उद्देशाने महाराष्ट्रातील कन्नड माध्यमातील शाळा आणि महाविद्यालयातील दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक वितरित केले जाते. हा कार्यक्रम श्री ष. ब्र. श्रीकंठ शिवाचार्य स्वामींच्या मार्गदर्शनात आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्धघाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा हस्ते तर सन्मान सोहळा पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते आणि कोथरूडचे आमदार मेधा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी विदयार्थ्यांना कन्नड वरिष्ठ साहित्यिक सुकन्या मारुती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, डॉ. शशिकला गुरुपूर, डॉ. सुनील मगर,जिल्हाधिकारी श्री सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला,पी यु.दिनेश,कुशल हेगडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.कन्नड अभिवृद्धी प्राधिकारचे अध्यक्ष प्रा.एस.जी.सिद्धरामय्या यांचे प्रस्ताविक होणार आहे.या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त कन्नड विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावेत असे आवाहन कन्नड अभिवृद्धी प्राधिकारचे सचिव के. मुरलीधर यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील मार्च २०१७ च्या कन्नड माध्यमाच्या शाळांतील दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त एकूण ३५२ विद्यार्थ्यांच्या सन्मान होणार आहे.त्यात प्रथम क्रमांक १२ हजार,द्वितीय क्रमांक ११ हजार, तृतीय क्रमांक १० हजार आणि प्रत्येकी एक शाळेचे बॅग, एक मनगटी घड्याळ, दोन पेनचा संच, दोन शब्दकोष संच, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या तालुक्यापासून पुणेपर्यंत विद्यार्थी व त्याच्या सोबतच्या दोघांचे प्रवास खर्च दिले जाणार आहे. त्याचबरोबर कर्नाटक बाहेरच्या राज्यात दहावीपर्यंत कन्नड माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे कर्नाटकात शिक्षण व नौकरीत ५ टक्के आरक्षण देखील दिले जाणार आहे.

Web Title: Akkalkot news kannad student felicitation