धक्कादायक...! अक्कलकोटमध्ये पोलिसानेच केली चोरी 

धक्कादायक...! अक्कलकोटमध्ये पोलिसानेच केली चोरी 
Updated on

सोलापूर ः चोराला पोलिसांनी पकडल्याचे आपण नेहमीच वाचतो, पण चोरी करणाऱ्या पोलिसाला पकडण्याची वेळ आज बुधवारी अक्कलकोटमधील पोलिसांवर आली. जप्त वाहनाचे टायर चोरताना सोलापूर शहर जेलरोड पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या पोलिसास अक्कलकोट पोलिसांनी चोरी करताना रंगेहाथ पकडले. आज संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार चोरीचा जप्त केलेला ट्रक (एमएच12, एयू - 7637) अक्कलकोट पोलिस ठाण्यात उभा करण्यात आला आहे. हा ट्रक अक्कलकोटच्या जुन्या पोलिस वसाहतीसमोर लावला आहे. या ट्रकमधील टायर आणि सुटेभाग मिळून सुमारे 40 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेताना चारजण आढळले. त्यामध्ये पोलिस कर्मचारी भाऊसाहेब ब्रह्मदेव शिंदे (नियुक्ती, सोलापूर जेलरोड पोलिस ठाणे), सोमा विठ्ठल गायकवाड (रा. बोळकवठा, ता. दक्षिण सोलापूर), गणेश मल्लेशी मरेवाले, दयानंद बसवराज यळकर (दोघेही रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) यांचा समावेश होता. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष चंद्रकांत मिस्त्री यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितांवर 379 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. राठोड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com