esakal | Sangali Lockdown: मिरजेत मद्यविक्री दुकानांबाहेर तळीरामांच्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

Sangali Lockdown: मिरजेत मद्यविक्री दुकानांबाहेर तळीरामांच्या रांगा

Sangali Lockdown: मिरजेत मद्यविक्री दुकानांबाहेर तळीरामांच्या रांगा

sakal_logo
By
स्नेहल कदम

मिरज (सांगली) : राज्यात ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाल्याने तळीराम शौकिनांनी मद्यविक्री दुकानाबाहेर मद्य खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र मिरज शहरात दिसत आहे. गतवर्षी करोना संसर्गाच्या सुरुवातीस तब्बल दोन महिने लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेक मद्य शौकिनांनी निर्व्यसनी जीवन जगण्याचा मार्ग पकडला. यामुळे सात-आठ महिने का होईना तळीरामांची संख्या घटली. मात्र पुन्हा लावून लॉक डाऊन केल्यावर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली.

सध्या राज्यासह सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढताहेत नियमित 400 ते 600 च्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. यावेळी व्यसनाधीन झालेलं रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अनेक व्यसनामुळे बेरोजगारी आर्थिक संकट अशी एक ना अनेक संकटे मद्यप्राशन यामुळे सुरू आहेत. तरीदेखील तळीरामकडून व्यसनमुक्ती होण्याचे प्रमाण कमी आहे. यातच लॉकडाऊन सारखी संकल्पना व्यसनमुक्ती करण्यास सोपी ठरत आहे.

मात्र व्यसनाच्या आहारी नियमित बुडालेल्यांना नियमितपणे मद्यप्राशन केल्याशिवाय चैन पडत नाही. या तळीरामांची उत्तम उदाहरण म्हणजे मिरजेत सध्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने प्रत्येक मद्यविक्री दुकानाबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा होय. कडकडीत लॉक डाऊनमध्ये पंधरा दिवसाचा साठा करण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे. यामध्ये ब्लॅकने होत असलेली मद्यविक्री यातून मिळणारे उत्पन्न देखील डोळे दिपवणारे आहे. नुकतेच काळाबाजार पद्धतीने विकणाऱ्या मद्यविक्रीवर आणि ठिकाणी पोलिसांकडून आणि उत्पादन शुल्ककडून धाडी टाकून कारवाई करण्याचे काम देखील सुरू आहे.