पाण्यासाठी म्हसवडमध्ये कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

म्हसवड - उरमोडी धरणाचे म्हसवड परिसरातील पाणी माण नदी मधील कोरड्या बंधा-यात सोडण्यात यावे या मागणीसाठी शेतक-यांनी आज (ता.१९) म्हसवड कडकडीत बंद ठेऊन मोर्चा काढुन रास्ता रोको आंदोलन केले. 

उरमोडी धरणाचे पाणी टंचाईग्रस्त भागाना देण्यासाठी सोडण्यात आले. परंतु, हे पाणी म्हसवड भागात सोडण्यास राजकीय मंडळीनी अधिकारी वर्गास हाताला धरुन विरोध करीत असल्याचा आरोप बेल भंडारा विचारमंचचे अध्यक्ष डॉ.प्रमोद गावडे यांनी केला.

उरमोडीचे पाणी दिवड धामणी मार्गाने माण नदीतील  शेबडेवस्ती म्हसवड विश्रामगृह यात्रा पटांगण व मानेवस्ती येथील चार बंधारे भरुन राजेवाडी तलावात सोडण्यात यावे अभी मागणी त्यांनी केली. यावेळी नगराध्यक्ष भगतसिंह विरकर, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, नगरसेवक गणेश रसाळ,युवराज सुर्यवंशी ,कैलास भोरे, किशोर सोनवणे, बाबासाहेब माने इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आज सकाळी अकरा वाजता सातारा- पंढरपुर रस्त्यावर हे रास्ता रोको आंदोलन झाले.

Web Title: all ahops are in Mhaswad for water supply