
अमरनाथ यात्रेसाठी गेलेले बेळगावातील सर्व भाविक सुखरूप, प्रशासनाची माहिती
बेळगाव : जम्मु काश्मीर येथिल अमरनाथ यात्रेसाठी बेळगावहून गेलेले सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ३२ भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले होते या सर्वांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पावसाळी वातावरणामुळे संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. कोरोनाचे संकट दुर झाल्यामुळे यावर्षी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 32 हून अधिक भाविकांचा समावेश आहे.
मात्र अचानक आलेल्या ढगफुटीमुळे अनेक भाविकांना आपला जीव गमावावर लागला असून ज्यावेळी ढगफुटी झाली त्यावेळी बेळगावचे विनोद काकडे हे त्यावेळी आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी होते. मात्र त्यांच्यासह त्यांचे मित्र सुखरूप असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर, संभाजी मेलगे, जीवन शहापूरकर, श्री रोकडे, नितीन सावंत, सुनिल निलजकर, राजू कुरणे, मारूती बंबरगेकर, सुनिल तंगनकर, अमित कनबरकर, नामदेव बैलुरकर यांनी देखिल सुखरूप असल्याची माहिती आपल्या कुटुंबाला दिली आहे. तसेच ढगफुटीमुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने अनेकजण परतीच्या मार्गावर असल्याने ते लवकरच आपल्या घरी परतणार आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
प्रशासनाने सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती दिली असली तरी अनेकांचे मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. मात्र जम्मू काश्मीर परिसरात पावसामुळे वातावरण योग्य नसल्याने संपर्क होत नसल्याची माहिती प्रशासनामध्ये देण्यात आली आहे. तसेच कुटुंबीयांनी कर्नाटक राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्र किंवा ०८०-१०७०,२६३-१०७० या क्रमांकावर संपर्क साधावा अशी आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच सर्व भाविकांना सुरक्षितपणे वापस आणण्याची जबाबदारी सरकार घेत असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
Web Title: All Devotees Amarnath Yatra Are Safe Administration Information Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..