मुंबई शहरातील राष्ट्रवादीचे इतर सर्व जिल्हाध्यक्ष पक्षाबरोबरच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

सचिन अहिरसारखा आपला एक सहकारी पक्ष सोडून गेल्याचे दुःख आहेच. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणाने पक्ष सोडला याची माहिती मिळाली नाही; मात्र मुंबई शहरातील इतर सर्व जिल्हाध्यक्ष एकत्र असून त्यांनी आम्ही पक्षाबरोबरच राहणार असल्याची ग्वाही दिली आहे.

- जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष

इस्लामपूर - सचिन अहिरसारखा आपला एक सहकारी पक्ष सोडून गेल्याचे दुःख आहेच. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणाने पक्ष सोडला याची माहिती मिळाली नाही; मात्र मुंबई शहरातील इतर सर्व जिल्हाध्यक्ष एकत्र असून त्यांनी आम्ही पक्षाबरोबरच राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. सचिनभाऊंनी पक्ष सोडल्याने पक्षावर फारसा परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, "सचिन अहिर यांनी आमच्याबरोबर गेली कित्येक वर्षे काम केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाने मुंबईमधील अनेक जबाबदाऱ्या मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर टाकल्या आहेत. त्यांनी आमदार, मंत्री म्हणून चांगले काम केले आहे. त्यांना त्यांच्या मतदारसंघात काही अडचणी दिसत असल्याने त्यांनी पक्ष सोडला असावा, असे दिसते; मात्र जो लढाईच्यावेळी बरोबर राहतो, त्याचाच कस लागतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोरून सर्व मार्गांचा अवलंब होताना दिसतो. कर्नाटकात आमदार खरेदी केल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रातही सत्ताधारी त्या पद्धतीने वागत आहेत."
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All the District President of NCP in the city of Mumbai along with the party