
एका कुटूंबातील चौघांनी जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बेळगाव : माता-पित्यांसह दोघा मुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) रामदूर्गला घडली आहे. प्रवीण शेट्टर (वय 37), पत्नी राजेश्वरी (27) आणि मुले अद्विक (6) आणि अमृता (8) अशी त्यांची नावे आहेत. एका कुटूंबातील चौघांनी जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या का करण्यात आली आहे, त्याचा तपास सुरु आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामदूर्गमध्ये शेट्टर कुटूंबाचे घर आहे. राहत्या घरात चौघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. किटनाशक पिऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामदूर्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्याकडून पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी आमदार महादेवप्पा यादवाड यांनी भेट देऊन आत्महत्येमागील नेमके कारण काय? त्याची चौकशी करण्याची सूचना पोलिसांनी केली. मंडल पोलिस निरीक्षक शशिकांत वर्मा प्रकरणाची चौकशी करत आहेत.
हे पण वाचा - चिप्स खाल्याने रंकाळ्यातील पाणबदकांचा मृत्यू
संपादन - धनाजी सुर्वे