esakal | बेळगावात विद्यार्थी संघटना आक्रमक ; चन्नमा सर्कल येथे सोमवारी आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Infiltration of Corona at Rani Channama University

बेळगावात विद्यार्थी संघटना आक्रमक ; चन्नमा सर्कल येथे सोमवारी आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठाने (Rani Channama University) (आरसीयु) पदवी आणि पदव्यूत्तरच्या मागील परीक्षा जाहीर केल्या आहेत. मात्र, ऑल इंडिया डेमॉक्रेटिक स्टुडंट ऑर्गनायझेशन (एआयडीएसओ) याला विरोध केला आहे. यासाठी सोमवारी (ता. १९) सकाळी ११.३० वाजता चन्नमा सर्कल येथे आंदोलन केले जाणार आहे. परीक्षा रद्द करेपर्यंत एआयडीएसोचे विविध मार्गाने आंदोलन सुरुच राहणार असून शेवटच्या टप्यात परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याचा विचार करून सरकारने तातडीने मागील परीक्षा रद्द करून पुढील परीक्षांचे आयोजन करावे, अशी मागणी संघटनेतर्फे केली जात आहे.(all-india-democratic-student-organization-monday-agitation-rani-channama-university-belguam-akb84)

राज्यसरकारने देखील परीक्षा घेण्याच्या सुचना केल्या आहेत. यामुळे पहिल्यांदा मागील सेमीस्टरच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढील सेमीस्टरचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी संबंधीत विद्यापीठाने देखील तयारी चालविली आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी धोका कायम आहे. तसेच अनेक विद्यार्थ्याचे लसीकरणही झालेले नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतरच परीक्षांचे आयोजन करावे. तसेच विद्यार्थ्यांच्या दोन्ही डोसला प्राधान्य द्यावे. त्यानंतरच परीक्षा व ऑफलाईन वर्ग सुरु करण्यासंबंधी विचार करावा, अशी मागणीही केली जात आहे.

एआयडीएसओ संघटनेच्यामार्फेत राज्यभरात सोमवारी आंदोलन केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत मागील परीक्षा घेऊ नये अशी मागणी केली जात आहे. सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर मागील परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे यासाठी राज्य सरकारनेच परीक्षा रद्द करावी. यापुर्वी मुख्यमंत्री, विविध मंत्री, खासदार व आमदारांनाही निवेदन दिले आहे. त्यांनी यावर विचार करावा, अशी मागणी होत आहे. अशी मागणीही होत आहे.

हेही वाचा- दीड लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात

राज्य सरकारने मागील पदवी, पदव्यूत्तर, अभियांत्रिकीच्या परीक्षा रद्द कराव्यात. यासाठी सोमवारी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. बेळगावातही आंदोलन असेल. मागणी मान्य न झाल्यास परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे राज्य सरकारने विचार करून निर्णय घ्यावा.

महांतेश बिळूर, जिल्हा समन्वयक, एआयडीएसओ

loading image