सांगलीतील 160 जणांवर कारवाईचा बडगा 

सांगलीतील 160 जणांवर कारवाईचा बडगा 

सांगली -  जिल्हा पोलिस दलातर्फे काल रात्री जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑल आऊट ऑपरेशन करण्यात आले. त्यात 160 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांकडून पावणे दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दल सर्तक झाला असून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी व्यापक प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकेबंदी करून कारवाई करण्यात आला.

काल (ता.13) रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑल आऊट ऑपरेशन राबविण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, सहा उपाधीक्षक, 38 अधिकारी, 254 कर्मचारी, 57 होमगार्ड यांचा मोहिमेत सहभाग होता. रेकॉर्डवरील आरोपी, फरार आरोपींचा शोध यासह धाबे-हॉटेल्स्‌ची तपासणी करण्यात आली. लॉजेस, रेल्वे स्टेशन, विविध चौक, कॉर्नर, बायपास रस्ता, जंक्‍शन अशा 27 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. 

कारवाईत चोरी-घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांवर, विना परवाना देशी दारू विक्री करणारे सहाजणांवर, जुगार खेळणाऱ्या तिघांवर, रेकॉर्डवरील 75 आरोपींवर, फरार असलेल्या 39 आरोपींवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 501 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 79 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com