ग्रामस्थांनो, कर भरा.. मच्छरदाणी मिळवा

Grampanchyat Shikarshingnapur
Grampanchyat Shikarshingnapur
Updated on

शिखर शिंगणापूर (जि. सातारा)  : ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी उपाययोजना करतानाच ग्रामपंचायतीची करवसुली करण्यासाठी शिंगणापुरात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचा संपूर्ण करभरणा करणाऱ्यांना मच्छरदाणी व मेडिक्‍लोअरचे वाटप करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई - सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
सध्या डासांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र तापाच्या साथीने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे डास निर्मूलन करून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी शिंगणापूर ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ग्रामपंचायतीने धूरफवारणी यंत्र खरेदी केले असून, डास निर्मूलनासाठी ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे वाडीवस्त्यांसह सर्वत्र धूरफवारणी करण्यात येत आहे.

हेही वाचा - वॉल्स सिंध क्रेट मन्यार पाेहचले सुरक्षितस्थळी
 

ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी अधिक खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने 450 कुटुंबांसाठी मच्छरदाणी खरेदी केल्या आहेत. ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्यकर, वीजकर पूर्णपणे भरणाऱ्या कुटुंबांना या मच्छरदाणी व मेडिक्‍लोअरचे मोफत वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कराची थकबाकी भरा व मच्छरदाणी मिळवा, असा अनोखा उपक्रम शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

अवश्य वाचा - ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन...

या उपक्रमामुळे नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासह करवसुली उद्दिष्टही साध्य होत आहे. ग्रामस्थांनी आपला करभरणा करून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच अभय मेनकुदळे व ग्रामविकास अधिकारी एम. टी. जाधव यांनी केले आहे. 

"" ग्रामपंचायत निधीतून मच्छरदाणी व मेडिक्‍लोअरचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीची करवसुली होण्यासही मदत झाली आहे.'' 
अभय मेनकुदळे, सरपंच, शिखर शिंगणापूर 


सातारा सातारा सातारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com