अलमट्टीतून चार लाखांवर; तर कोयनेतून 1,10,970 क्युसेक विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

 कोल्हापूर - कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा आज दुपारी चार वाजता चार लाख क्यूसेक्स  विसर्ग झाला आहे. तर कोयनेतून 1,10,970 क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे उघडले असून मुख्य तीन दरवाजे 2 फूटाने उचलले आहेत. त्यामधून 6000 क्युसेक विसर्ग असा एकूण 1,74,00 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणावरील विसर्ग हा कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थिती ठरवणारा असतो. अलमट्टीतून ज्यादा विसर्ग झाल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर स्थिती नियंत्रणात राहू शकते. सांगलीतून अलमट्टी धरणावर नेमका किती विसर्ग आहे, ती वाढविणे अपेक्षित आहे, याबाबत जलसंपदा विभाग आणि शासन पातळीवर सतत चर्चा होत आहे. 

कोल्हापूरच्या राधानगरी आणि  दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातूनही विसर्ग सुरू आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी सुरू आहे. महापुराचा विळखा आणखी घट्ट होत आहे. यामुळे अलमट्टीच्या विसर्गाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अलमट्टी धरणाची क्षमता 124 टीएमसी आहे. जास्तीत जास्त पाणी साठवण्याची पातळी 519 मीटर आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 51 फूट 3  इंच असून एकूण 110 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.36  टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Almatti Dam water discharge above 4 lakh