बायपास साठी पर्यायी मार्गाचा विचार करावा, शेतकऱ्यांची मागणी | farmers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी हे विकासाच्या विरोधात नसून सुपीक जमिनीतून रस्ता करू नये

बायपास साठी पर्यायी मार्गाचा विचार करावा, शेतकऱ्यांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शेतकरी हे विकासाच्या विरोधात नसून सुपीक जमिनीतून रस्ता करू नये. अशी शेतकऱ्यांची भूमिका असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने शेतकऱ्यांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा विचार करावा. अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

हलगा ते मच्छे बायपासच्या कामाला न्यायालयाने पुन्हा एकदा स्थगिती दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रस्त्याच्या कामाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीजण चुकीचा प्रचार करीत शेतकरी विकासाच्या आड येत आहेत असे संदेश पाठवले जात आहेत. तसेच हलगा मच्छे बायपास झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल त्यामुळे रस्ता करावा अशी मागणी करीत महामार्ग प्राधिकरणची बाजू घेत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी असे संदेश पाठवून समाजात चुकीचा गैरसमज पसरविऱ्यां लोकांपासून दूर राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत शेतकरी कधीही विकासाच्या आड आले नाहीत.

हेही वाचा: सांगली जिल्हा बँकेसाठी दुपारीच ५६ टक्के मतदान

मात्र बायपासच्या रस्त्यामुळे वडगाव, शहापूर मच्छे, हलगा आदी भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच या भागातील जमीन तिबार पिके देणारी असून नियमाप्रमाणे सुपीक जमिनीतून रस्ता करू नये अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. तरी देखील याच जमिनीतून रस्ता करण्याचा घाट सातत्याने घातला जात आहे. कामाला सुरुवात झाल्यापासूनच शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे तसेच न्यायालयानेही शेतकऱ्यांची बाजू घेत कामाला स्थगिती दिली आहे. मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचे भु संपादन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांची बाजू काही जण घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रीय पक्षांच्या काही कार्यकर्त्यांकडून बायपाससाठी सपाटीकरण करण्याचे काम हाती घेतल्या पासूनच शेतकरी विरोधी संदेश पाठवून देत शेतकऱ्यांना विकास विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे या प्रकाराचा शेतकऱ्यांनी जाहीर निषेध केला असून शेतकऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी आणि अशा लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे मत व्यक्त होत आहे.

"शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून रस्ता करून विकास साधने योग्य नाही. शेतकर्‍यांनी काही वर्षांपूर्वीच बायपास साठी पर्यायी मार्ग सुचविला आहे त्या भागातून रस्ता केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. त्यामुळे अजून देखील महामार्ग प्राधिकरणाने पर्यायी मार्गाचा विचार करणे गरजेचे आहे."

- राजू मरवे, अध्यक्ष रयत संघटना

"शेतकऱ्यांचा विरोध योग्य असून शेतकऱ्यांना विकास विरोधी म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. शेतकरी टिकला तरच देश टिकणार आहे. त्यामुळे सुपीक जमिनीतून रस्ता न करता इतर भागातून रस्ता केल्यास कोणतीही समस्या येणार नाही."

- कीर्तीकुमार कुलकर्णी, शेतकरी

loading image
go to top