कुपवाड: येथील औद्योगिक वसाहतीतील रिद्धी-सिद्धी ॲल्युमिनियम कारखान्यात साहित्य चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. दोघा रखवालदारांनीच संगनमत करून कारखान्यातील सुमारे आठ लाख रुपयांच्या साहित्याची चोरी केली आहे. कुपवाड पोलिसांत याप्रकरणी नोंद झाली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.