'नसलेल्या गोष्टी इतिहासात घुसडण्याचे प्रयत्न '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - ""शिक्षणक्षेत्र महत्त्वाचे असण्याच्या काळातच शिक्षणाचा दुरुपयोग होतो आहे. ज्या गोष्टी पाहिलेल्या नाहीत, त्या शिक्षणात, अभ्यासक्रमात घुसडण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषत: इतिहासाच्या बाबतीत ही घुसखोरी मोठ्या प्रमाणात घडत आहे. यामुळे शिक्षणतज्ज्ञांनी सखोल विचार करून शिक्षणाला योग्य दिशा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत; कारण शिक्षणाच्या माध्यमातूनच जबाबदार नागरिक घडवायचे आहेत,'' असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. 

कोल्हापूर - ""शिक्षणक्षेत्र महत्त्वाचे असण्याच्या काळातच शिक्षणाचा दुरुपयोग होतो आहे. ज्या गोष्टी पाहिलेल्या नाहीत, त्या शिक्षणात, अभ्यासक्रमात घुसडण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषत: इतिहासाच्या बाबतीत ही घुसखोरी मोठ्या प्रमाणात घडत आहे. यामुळे शिक्षणतज्ज्ञांनी सखोल विचार करून शिक्षणाला योग्य दिशा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत; कारण शिक्षणाच्या माध्यमातूनच जबाबदार नागरिक घडवायचे आहेत,'' असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. 

न्यू कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व गौरव समारंभ आज झाला. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष शामराव चरापले अध्यक्षस्थानी होते. शाहू महाराज यांच्या हस्ते बोर्डिंगचे चेअरमन डी. बी. पाटील, माजी प्राचार्य डॉ. के. आर. यादव, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश तानाजी नलवडे यांना मानपत्र, शाल, श्रीफळ, ग्रंथभेट, पुष्प देऊन गौरविण्यात आले. 

तत्पूर्वी, डी. बी. पाटील यांच्या मानपत्राचे वाचन श्री. कापसे, डॉ. यादव यांच्या मानपत्राचे वाचन ऍड. विवेक रणखांबे, न्यायाधीश नलवडे यांच्या मानपत्राचे वाचन प्रा. सर्जेराव शेटके यांनी केले. न्यायाधीश श्री. नलवडे यांच्या अनुपस्थित मानपत्राचा स्वीकार वडील वसंतराव नलवडे यांनी केला. यानंतर आमदार डॉ. सुजित मिणचेकर, न्यायमूर्ती पी. आर. भावके, सागर चव्हाण, आरती इंडस्ट्रिजचे अध्यक्ष डॉ. भारतकुमार पत्रावळे यांचा सत्कार झाला. प्रा. डॉ. ए. ए. कलगोंडांच्या हस्ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे उपाध्यक्ष आर. डी. पाटील (वडगावकर), आर. डी. आतकिरे, संचालक डी. जी. किल्लेदार, के. जी. पाटील, सी. आर. गोडसे, वाय. एस. चव्हाण, व्ही. एस. मोरे, सी. एम. गायकवाड, आप्पासाहेब वणिरे, विनय पाटील, डॉ. पी. के. पाटील, डॉ. एन. व्ही. नलवडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. अमर सासने यांचाही सत्कार झाला. 

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ""जीवनातील शिस्त, जडणघडण, संस्कार जसे घरातून झाले तसेच ते न्यू कॉलेजमधून झाले. या संस्कार, शिस्तीमुळेच कॉलेज जीवनात माझी चारचाकी गाडी कधीही कॉलेजच्या आवारात आली नाही. आम्ही घडलो, यशस्वी झालो ते या कॉलेजमुळे.'' 

माजी प्राचार्य डॉ. यादव म्हणाले, ""21 वर्षे कॉलेजमध्ये कार्यरत होतो. आज तुम्ही सगळे एकावेळी भेटलात मनाला आनंद वाटला. भरून पावलो. आजही अनेक यशस्वी विद्यार्थी माझ्याकडे प्राचार्य म्हणून पाहतात, हे माझे भाग्य आहे. '' 

शाहीर आझाद नायकवडी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पोवाडा सादर केला. प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शेटके, धनंजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. कलगोंडा यांनी आभार मानले. कार्यकारिणी सदस्य लाला गायकवाड, अशोक वणकुद्रे, उदय कापसे, डी. के. सरगर, दीपक घोडके, विश्‍वास उन्हाळे, आण्णा नालंग, एस. टी. पाटील, एस. आर. लाड यांनी विशेष परिश्रम घेतले. 

संभाजीराजे-मालोजीराजेंचा सत्कार 
शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते खासदार संभाजीराजे, मालोजीराजे यांचा शाल, श्रीफळ, पुष्प व मानपत्र देऊन सत्कार झाला. यावर खासदार संभाजीराजे म्हणाले, ""मी आणि बंधू मालोजीराजे यांचा सत्कार माझ्या वडिलांच्या हस्ते प्रथमच एकत्रितपणे झाला. माझ्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण आहे.'' 

50 हजारांचा धनादेश 
प्राचार्य डॉ. यादव यांनी न्यू कॉलेज माजी विद्यार्थी संघाचे कार्य इथूनपुढेही चांगल्या पद्धतीने घडावे, याकरिता 50 हजारांचा धनादेश सुपूर्द केला.

Web Title: Alumni Gathering affection