esakal | आई जाण्याचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी बजावले कर्तव्य

बोलून बातमी शोधा

आई जाण्याचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी बजावले कर्तव्य

राष्ट्रीय आपत्तीला सामोरे जाताना त्याने दाखवलेले धैर्य, निष्ठा खूप काही सांगून जात आहे. पोलीस आणि आरोग्य विभाग जीवाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षिततेसाठी कसं कार्यरत आहे, याचं प्रातिनिधिक उदाहरणच त्याने सर्वांसमाेर ठेवले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आई जाण्याचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी बजावले कर्तव्य
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : काेराेना व्हायरसची धास्ती जगव्यापी झाली आहे. भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली आणि उभा देश या जीवघेण्या आपत्ती विरोधात लढण्यासाठी एकसंध झालाय. त्याचेच प्रतिबिंब अभूतपूर्व अशा जनता कर्फ्युच्या रुपात रविवारी (ता.22) दिसून आले. सारं सारं काही विसरून लोक एक झालेत, द्वेष, मत्सर आणि तथाकथित कसल्याशा आपमतलबीपणाच्या सर्वच भिंती उद्धवस्त झाल्या आणि माणुसकीची एक भिंत उभी राहिली. भली मोठी आणि भक्कम. या भक्कमपणाची ताकद आहे ती आरोग्य आणि पोलीस प्रशासन यंत्रणा. ही ताकद किती महत्वपूर्ण याचा अनुभव नुकताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे स्वीय सहयाक महेंद्र जाधव यांना आली.
 
त्यांंच्या आत्या श्रीमती जयश्री अशोकराव भोसले यांचे रविवारी (ता.22)  निधन झाले. त्यांचे वास्तव्य भुईंजलाच होते. त्यांचे चुलतभाऊ रामदासबापू यांच्या त्या सख्ख्या आत्या आणि त्यांच्याच घरी त्यांचे वास्तव्य. जाधव म्हणाले सरुआत्या म्हणून त्या सर्वपरिचित. तस सरुआत्या ठणठणीत होत्या. अगदी सकाळीच त्या घरी आल्या होत्या. न्यायाधीस झालेला आमचा पुतण्या ऋषिकेश याला शोधत होत्या. त्यावेळी पत्नी वनिता आणि त्यांचे बोलणेही झाले. आणि त्यानंतर काही तासातच सरूआत्या गेल्या असे आम्हांला कळले.

सारंच अकल्पित, धक्कादायक. हा धक्का त्यांचा मुलगा आणि उंब्रज पोलीस ठाण्यातील कर्मचारी अभयसिंह अशोकराव भोसले यांच्यासाठी किती मोठा याची कल्पनाही करवत नाही. मात्र अभयसिंह यांनी स्वतःच्या आईच्या जाण्याचे दुःख काळजावर दगड ठेऊन पचवले. पचवावेच लागले असे आपण म्हणून कारण प्रथमच देशात निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्तिथी हाताळन्याच्या मोहिमेतील तो एक सैनिक आहे. पोलीस दलातील हा लढवय्या सैनिक या परिस्थितीत आपल्या लढाऊ बाण्याने कार्यरत राहिला. आपले अश्रू पुसून, आपले स्वतःचे दुःख गिळून तो स्वतःचे कर्तव्य बजावत राहिला. कुठून एवढं बळ आलं त्यांच्या अंगी ? कोणताही पहाड थिटा पडावा एवढी उंची आणि ताकद त्यांच्या कर्तव्यभावनेने दाखवली. स्वतःच्या आईचे निधन झाले तरी भारतमातेची सर्व लेकरं सुरक्षित रहावी यासाठी अभयसिंह  यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठेस खरंतर सलामच करावा लागेल.

सातारकरांनाे आता तुमची साथ हवी आहे : जिल्हाधिकारी 

राष्ट्रीय आपत्तीला सामोरे जाताना त्याने दाखवलेले धैर्य, निष्ठा खूप काही सांगून जात आहे. पोलीस आणि आरोग्य विभाग जीवाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षिततेसाठी कसं कार्यरत आहे, याचं प्रातिनिधिक उदाहरणच त्याने सर्वांसमाेर ठेवले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Coronavirus : सातारा : कॅलिफोर्नियातील प्रवासी रुग्णालयात दाखल; नागरीकांनी घरीच थांबावे

#WeVsVirus : सकाळ डिजिटल हॅकेथॉन; सहभागी व्हा