डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या शाळेतील अमोलचा धीरोदात्तपणा

विशाल पाटील
शनिवार, 9 जून 2018

सातारा - इंग्रजीची परीक्षा सुरू... परीक्षा सुटताच वडिलांचे निधन झाल्याचे समजले... संध्याकाळी अग्नी दिला... रक्षाविसर्जन विधी उरकून पुन्हा बीजगणिताची परीक्षा दिली... दु:खाचा डोंगर कोसळला, तरीही त्याने दहावीची परीक्षा दिली अन्‌ तो पासही झाला... आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाच आणखी तीव्र संकट ओढावले, तरीही त्यांनी दहावीची लढाई जिंकली, त्याचे नाव आहे अमोल जाधव! 

येथील प्रतापसिंह विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अमोलचे वडील आनंदा, आई ताराबाई या मोलमजुरी करण्यासाठी सातारामध्ये राहत होते. गवंडी काम करणाऱ्या दांपत्याचा मुलगा अमोल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेत शिक्षणाची सुरवात केली, त्याच प्रतापसिंह विद्यालयात शिक्षण घेत होता. दहावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्याला श्‍वसननलिकेचा त्रास सुरू झाल्याने त्याला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले होते. चार दिवस रुग्णालयात असलेल्या अमोलला बाहेर सोडण्यास डॉक्‍टर राजी नव्हते. मात्र, अमोलला परीक्षा द्यायचीच असल्याने त्याला सोडले. 

त्याला डिस्चार्ज देताहेत तोपर्यंत वडिलांनी पोटाच्या विकाराने ग्रासल्याने त्यांनाही दाखल केले. अमोल इंग्रजीची परीक्षा देत होता, तोपर्यंत त्याच्या वडिलांनी अंतिम श्‍वास घेतला. अमोलचा पेपर सुटल्यानंतर त्याला वडिलांच्या निधनाची बातमी समजून धक्‍काच बसला. ठोसेघर (ता. सातारा) येथे गावी जाणून त्याने अग्नी दिला. बीजगणिताचा पेपर असल्याने रक्षाविसर्जन विधी लवकर आटोपून अमोलने परीक्षा दिला. 

पण, अमोलच्या धैर्याचा प्रवास येथेच थांबला नाही. उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका शबनम मुजावर यांनी त्याला धीर देत मित्राच्या घरी राहून परीक्षा देण्यास सांगितले. मात्र, एकट्या आईला घरी ठेवून मी कसा साताऱ्यात राहू असे त्याने ठरविले. व पुढील पेपर त्याने आईला आधार देत ठोसेघर येथून ये- जा करत मोठ्या धैर्याने दिले. अमोल 49.60 टक्‍के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. 

Web Title: amol jadhav pass 10th exam with a good marks