पन्हाळ्यावर ३७५ फुट तिरंग्याची पदयात्रा काढुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panhala

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाच्या जनजागृतीसाठी पन्हाळा शहरातील मुख्य मार्गावरून ३७५ फुट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

पन्हाळ्यावर ३७५ फुट तिरंग्याची पदयात्रा काढुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरवात

आपटी - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाच्या जनजागृतीसाठी पन्हाळा शहरातील मुख्य मार्गावरून ३७५ फुट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत कोल्हापूर हायकर्स, पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद पन्हाळा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पावनखिंडीत धारातीर्थ पडलेल्या स्वामीनिष्ठ सेवकांच्या स्मरणार्थ व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ३७५ फूटी भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले होते.

उपविभागिय अधिकारी बी.आर.माळी,तहसीलदार रमेश शेंडगे,नायबतहसीलदार विनय कौवलवकर, आभिनेत्री सोनाली पाटील, कोल्हापुर हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांचेसह अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक देशाचा ध्वज घेऊन या पदयात्रेत सहभागी झाले होते.

सुरुवातीला माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल व अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या हस्ते वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे पुतळ्याचे व ३७५ फुट तिरंग्याचे पुजन करण्यात आले. यावेळी पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला तिरंगा ध्वज देऊन पदयात्रेला प्रारंभ झाला. या पदयात्रेत कोल्हापुर हायकर्स ची पावनखींड पदभ्रमंतीसाठी आलेली मुले, संजीवन चे विद्यार्थी, नगरपरिषद चे कर्मचारी, पन्हाळा नागरीक सहभागी झाले होते. ३७५ फुट तिरंगा घेऊन भारत माता की, जय च्या घोषणा देत संपुर्ण गावातुन काढलेल्या या पदयात्रेची छत्रपती शिवाजी महाराज मंदिरा समोर राष्ट्रगित म्हणुन सांगता करण्यात आली.

आज पन्हाळ्याच्या सर्व शासकिय कार्यालयावर ध्वजवंदन करण्यात आले, तर सज्जाकोठी येथे मुख्य ध्वजवंदन उपविभागिय अधिकारी बी. आर. माळी यांचे हस्ते करण्यात आले.

Web Title: Amrutmohotsav Of Independence Day Begins With 375 Feet Tiranga Procession On Panhala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..