...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी  

हेमंत पवार
मंगळवार, 15 जानेवारी 2019

कऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घारेवाडीत (जि.सातारा) सुरु असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीत तरुणांना प्रोत्साहीत केले. त्या कार्यक्रमाचे आभार मानताना चित्रपट अभिनेते समृध्दी जाधव यांनी आपल्या वक्तृत्वाने पाटेकरांचे मनच जिंकले. जाधव यांच्या शब्दांच्या फेकीवर पाटेकर फिदा झाल्याने जाधव यांना पाटेकरांनी मिठी मारुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

धुळोबा डोंगरावर १८ वर्षापासुन स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधुन बलशाली युवा हृदय संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात शुन्यातुन विश्व निर्मीती करणारे, ज्यांच्यामुळे अनेकांचे संसार सुखी झाले आहेत अशा व्यक्ती, ज्यांनी आपले सारे आयुष्य देश, समाजसेवेसाठी खर्ची घातले आहे, जे युवकांसाठी आयडॉल ठरले आहेत आशा प्रज्ञावंतांना बोलावुन त्यांचे अनुभव उपस्थित हजारो तरुणांसमोर शेअर करण्याची किमया साधली जाते. यंदाच्याही संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी निमंत्रीत करण्यात आले होते. आपल्या खुमासदार शैलीत दोन्ही कलाकारांनी युवकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे आभार मानण्याचे काम चित्रपट अभितेने समृध्दी जाधव यांच्याकडे होते. आभार मानत असताना त्यांनी आपल्या अमोघ वाणीने केलेल्या वक्तत्वावर खुद्द नाना पाटेकर फिदा झाले. समृध्दी जाधव यांच्या अवघ्या दोन मिनीटांच्या वक्तृत्वाने पाटेकरांचे मन जिंकले. त्यांच्या वक्तव्यावर फिदा होवुन पाटेकर यांनी समृध्दी जाधव यांना मिठी मारुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे उपस्थित हजारो तरुण-तरुणींनी टाळ्यांचा गजर करुन जाधव यांना अभिवादन केले. कार्यक्रमस्थळी त्यांच्या आभाराची आणि नानांनी त्यांना मारलेल्या मिठीचीच चर्चा सुरु होती.  

चित्रपट क्षेत्रातील एवढ्या मोठ्या कलाकाराने माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या वक्तृत्वाला दाद देवुन मला मारलेली मिठी ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असुन त्यासाठी शिवमने मला दिलेले व्यासपीठ हेही महत्वाचे आहे. रुपेरी पडद्यावर ज्यांना कठोर मनाचे कलाकार म्हणुन पहतो त्यांचे मन किती संवेदनशील आहे याचीही मला प्रचिती आली.
- समृध्दी जाधव

Web Title: ... and Nana Patekar hugged the Jadhwa