साठ वर्षांवरील अंगणवाडी सेविकांना दिलासा

हेमंत पवार
गुरुवार, 19 एप्रिल 2018

कऱ्हाड - शासनाने मध्यंतरी अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षावरून ६० वर्षांवर आणले होते. मात्र, शासनाने नुकतेच एक पत्र काढून ज्या अंगणवाडी सेविकांचे वय ६० वर्षे पूर्ण आणि त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना कामावरून कमी करू नये, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

अंगणवाडीमध्ये बालकांना अक्षर ओळखीसह प्राथमिक शिक्षण दिले जाते. शासनाने मध्यंतरी राज्यातील अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षावरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ६० वर्षे व त्यापुढील अनेक अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्त व्हावे लागणार होते. त्यासंदर्भातील नोटीसही बालविकास प्रकल्प विभागाने संबंधित अंगणवाडी सेविकांना दिल्या होता. मात्र, संबंधित निर्णयाची कार्यवाही अद्यापही पूर्ण झालेली नाही. यादरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनातही यासंदर्भातील प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचा संदर्भ देत शासनाने ६० वर्षांवरील अंगणवाडी सेविकांना सध्यातरी कामावरून कमी करू नये, असे पत्र संबंधित विभागाला पाठवले आहे. त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकांचे वय ६० व त्यापुढे आहे, अशा अनेक अंगणवाडी सेविकांना सध्यातरी दिलासा मिळणार आहे. मात्र, शासनाकडून त्यासंदर्भात नेमका काय अध्यादेश जारी होणार यावरही संबंधित ६० वर्षांवरील अंगणवाडी सेविकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

फिटनेस प्रमाणपत्र द्यावे लागणार 
शासनाने सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे केले आहे. त्या अध्यादेशाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ६० व त्यापुढे वय असणाऱ्या अंगणवाडी सेविका कामावर सध्यातरी राहणार आहेत. मात्र, ज्यांचे वय ६० व त्यापुढे आहे त्यांना संबंधित विभागाला फिटनेस प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: anganwadi employee