सांगलीत अंगारकी संकष्टी भक्तिमय वातावरणात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

सांगली - नूतन वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी आज भक्तिमय वातावरणात साजरी झाली. शहरातील गणेश मंदिरात पहाटेपासून भक्तांची दर्शनासाठी रीघ लागून होती. संस्थानच्या गणेश मंदिरात जिल्ह्यातील भक्तगण उपस्थित होते. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणेशाला आज भक्तिभावाने वंदन करण्यात आले. शहर आणि परिसरातील गणेश मंदिरात संकष्टीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. काही मंदिरात उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. येथील संस्थानच्या गणेश मंदिरात पहाटे गणरायाची पूजा करण्यात आली. दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. बागेतील गणेश मंदिरातही भक्तगण उपस्थित होते. पहाटे चालत गणेश मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्यांचीही संख्या अधिक होती. अंगारकीनिमित्त बाजारपेठेत उपवासाचे पदार्थ आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिस बंदोबस्त सकाळपासून तैनात केला होता.

Web Title: angarki chaturthi in sanlgi