महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समन्वयकपदी अनिकेत कदम यांची निवड

संदिप कदम
रविवार, 8 एप्रिल 2018

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्या गठीत करण्यासाठी काँग्रेस नेते व कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार अनिकेत दुर्वास कदम यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली. 

फलटण शहर (जि. सातारा) -  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आगामी निवडणूकीच्या दृष्टीने बुध कमिटी गठीत करण्यासाठी महाराष्ट्र  विधानसभा क्षेत्र निहाय समन्वयकांच्या नेमणुका प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केल्या असुन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिट्या गठीत करण्यासाठी काँग्रेस नेते व कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार अनिकेत दुर्वास कदम यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली. 

स्वराज संघटनेचे शहर अध्यक्ष असुन त्यांचे आतापर्यंतचे पक्षासाठी योगदान लक्षा त घेता त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. या निवडी बद्दल त्यांचे माजी खाखदार हिंदूराव नाईक निंबाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार  जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते सुभाषराव सुर्यवंशी बेडके, प्रल्हादराव साळुंखे पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजीतसिंह नाईक निंबाळकर, नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिंगबर आगवणे, नगरसेवक सचिन सुर्यवंशी. बेडके, सचिन अहिवळे, ऋषिराज नाईक निंबाळकर, शिवाजीराव फडतरे, धनंजय साळुंखे पाटील, महेंद्र सुर्यवंशी बेडके, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे तसेच स्वराज संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष गावडे, राहुल शहा व स्वराज संघटना, युवक काँग्रेस व NSUI फलटण तालुका आदींनी अभिनंदन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Aniket Kadam Selected as a coordinator of Maharashtra state congress